madhy pradesh  sarkarnama
देश

MP Election Result 2023 : उज्जैनमध्ये मतमोजणीपूर्वी तुटले पोस्टल बॅलेट बॉक्सचे सील...

Sudesh Mitkar

Madhya Pradesh News: मतमोजणीपूर्वी उज्जैनमध्ये काँग्रेसने मोठा आरोप केला आहे. पोस्टल बॅलेटचे सील तुटल्याचे काँग्रेस उमेदवाराचे म्हणणे आहे. तराणा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार महेश परमार यांनी हा आरोप केला आहे. त्यांना एका बॉक्सचा जुना सील तुटून नवीन सील लावण्यात आल्याचे दिसले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, निवडणूक आयोगाने या वृताचे खंडन केले आहे. (Madhya Pradesh Results in Marathi)

यापूर्वी मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये पोस्टल बॅलेटमध्ये अनियमिततेबाबत काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने कारवाई करत बालाघाटचे उपविभागीय दंडाधिकारी गोपाल सोनी यांना निलंबित केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसकडून आरोप करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबबात खुलासा करताना जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार पुरुषोत्तम यांनी सांगितले , "निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, पोस्टल मत पत्रिकांच्या पेट्या जिल्हा कोषागारातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मतमोजणी केंद्रात दिवसभरात हलविण्यात आल्या. सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते.

"या प्रक्रियेची व्हिडिओग्राफीदेखील करण्यात आली आहे." बॅलेट बॉक्सवर लॉकवर पेपर सील नसल्याबद्दल आक्षेप घेतल्यानंतर तपासणी केल्यावर असे आढळून आले, की झाकणावर दोन सील आहेत; परंतु लॉकवर नाही. त्यामुळे कोणतीही छेडछेड करण्यात आलेली नाही, असे त्यांनी संगितले."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT