Madhya Pradesh Assembly Election Sarkarnama
देश

Madhya Pradesh Assembly Election Results : मध्य प्रदेशात पुन्हा शिवराजसिंह यांचा बोलबाला; महिलांचा 'हटके' विजयी जल्लोष

Deepak Kulkarni

Bhopal News : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. आत्तापर्यंतच्या निकालात राजस्थान, मध्य प्रदेशासह छत्तीसगडमध्ये भाजपने निर्विवाद आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

याचवेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाचा फॅक्टर देशभरात चालणार असल्याचा दावा करणारा काँग्रेस दारुण पराभवाच्या छायेत आहे. भाजप (BJP) ने घेतलेल्या विजयी आघाडीमुळे ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात 'एक्झिट पोल'चे आकडे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून, त्यात भाजपला 161 तर काँग्रेसला 66 जागा मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशातून भाजपची सत्ता जाणर असल्याचं सांगितलं जात होतं. (Madhya Pradesh Assembly Election Results)

पण प्रत्यक्षात एक्झिट पोलचे कल फोल ठरले आहेत. मध्य प्रदेशात भाजपला प्रचंड मोठा फायदा होताना दिसून येत असून, विजय निश्चित मानले जात आहे. याच विजयी आघाडीनंतर मध्य प्रदेशात भाजप महिला कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी मध्य प्रदेशातील विजयाचं क्रेडिट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. राज्यात मोदींच्या प्रचंड सभा झाल्या. लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. लोक त्यांच्याशी जोडल्या गेले. त्यामुळे आज निकाल वेगळा लागला आहे. केंद्रातील मोदी सरकारने जे काम केलं आहे. ज्या योजना आणल्या त्याची आम्ही योग्यप्रकारे अंमलबजावणी केली. आम्ही राज्यात लाडली लक्ष्मीपासून ते लाडली बहनपर्यंतच्या स्किम लागू केल्या. लोकांना या स्किम आवडल्या असल्याचा दावा चौहान यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर महिलांनी मध्य प्रदेशात एकत्र येत 'फुलों का तारों का, सबका कहना है...' या हिंदी गाण्याची ओळी म्हणत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले आहेत.तसेच या गाण्याच्या वेळी सादर केल्यानंतर महिलांनी चौहान यांच्यावर गुलाबाच्या फुलांची उधळण केली आहे. या विजयी जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शिवराजसिंह चौहान सरकारने राज्यात लागू केलेल्या लाडली लक्ष्मीपासून ते लाडली बहनपर्यंतच्या सर्व योजना मतदारांना आवडल्या असल्याचे बोलले जात आहे.

भोपाळ येथे भाजपच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. या वेळी महिलांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पत्नीसोबत फुगडी खेळत जल्लोष केला. तसेच फुलों का तारों का या हिंदी गाण्याच्या ओळी म्हणत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. या विजयी जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मुख्यमंत्री कोण...?

मध्य प्रदेशात निवडणूक कलांमध्ये भाजपने निर्विवाद आघाडी घेतली आहे. आता मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. भाजप पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांच्या हातीच राज्याची सत्ता देणार, की अन्य कुणाला मुख्यमंत्री करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कदाचित भाजप मध्य प्रदेशसाठी मोठा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्याने सर्वांच्या नजरा मध्य प्रदेशावर खिळल्या आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT