arvind kejiriwal  sarkarnama
देश

Arvind Kejriwal : केजरीवाल यांना सर्वाधिक आशा होती, त्यांचेच डिपॉझिट जप्त ?

Madhya Pradesh Results in Marathi : मध्य प्रदेशात आम आदमी पक्षाच्या आशांना मोठा धक्का

Sudesh Mitkar

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा काँग्रेसचा पराभव केला आहे. 20 वर्षांच्या सत्तांतरानंतरही 'अँटी इनकम्बेंसी'चे दावे फेटाळून भाजपने विजय मिळवला आहे. याबरोबरच मध्य प्रदेशात आम आदमी पक्षाच्या आशांना ही मोठा धक्का बसला आहे. ज्या उमेदवाराकडून 'आप'ला सर्वाधिक आशा होती, त्याचे डिपॉझिटही जप्त होऊ शकते.

मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. 20 वर्षांच्या सत्तांतरानंतरही 'सत्ताविरोधी लाटे'चे दावे खोडून काढत मध्ये प्रदेश मध्ये फक्त भाजपची लाट असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत भाजपने १६० जागांवर निर्णायक आघाडी मिळवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम आदमी पक्षाने सिंगरौली नगराध्यक्षा राणी अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी स्वतः सिंगरौली येथे राणी अग्रवाल यांचा प्रचार केला होता. तरी देखील येथे आपसाठी निकाल निराशाजनक ठरत आहे. दुपारी दोनच्या सुमारास मतमोजणीच्या पाच फेऱ्यांनंतर सिंगरौलीतून भाजपचे उमेदवार राम निवास शाह आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या रेणू शाह दुसऱ्या क्रमांकावर तर बसपचे चंद्र प्रताप विश्वकर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आम आदमी पक्षाच्या उमेदवार राणी अग्रवाल चौथ्या क्रमांकावर आहेत. राणी अग्रवाल यांना केवळ 2996 मते मिळाली आहेत.

मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली आहे. मात्र, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षानेही येथे पाय रोवण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी 'आप'ने सुमारे 6 डझन जागांवर उमेदवार उभे केले होते. स्वतः अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक निवडणूक रॅली आणि रोड शोद्वारे पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागितली. तरीदेखील सर्व जागांवर आप पिछाडीवर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT