Madhya Pradesh News : भाजपला बहुमत मिळत असल्याचे मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशातील भाजप सरकारचा चेहरा कोण असेल, यावर चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची खुर्ची सुरक्षित राहणार, की त्यांच्या जागी अन्य कुणाला बसवणार? हा प्रश्न उपस्थित होत असताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, नरेंद्रसिंह तोमर आणि कैलाश विजयवर्गीय हे आपापल्या मतदारसंघात विजया समीप आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्रिपदासाठी ही त्यांची नावे चर्चेत आहेत.
मध्य प्रदेशमध्ये एक्झिट पोलनंतरच बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ग्वाल्हेरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. रविवारी निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेदेखील सक्रिय झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गाठले. तेथे त्यांची भेट शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एकाकी फलंदाजी केली आहे. त्यांनी 160 हून अधिक रॅली केल्या आहेत. मुख्यमंत्री शिवराज यांना ग्वाल्हेरमध्ये तुम्ही पाचव्यांदा मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न केला असता ते भारतीय जनता पार्टी जिंदाबाद म्हणत पुढे निघून गेले. याचा अर्थ त्यांच्या नावाबाबत अजूनही शंका आहे. त्यामुळे अन्य दावेदारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या नावाचीदेखील सर्वाधिक चर्चा आहे. शिवराज यांच्यानंतर राज्यातील भाजपच्या ओबीसी प्रवर्गातील सर्वात मोठ्या चेहऱ्यांमध्ये प्रल्हाद पटेल यांचे नाव आघाडीवर आहे. मध्य प्रदेशात ओबीसी लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. भाजपने चेहरा बदलल्यास त्यांचा दावा बळकट होईल.
मुरैना जिल्ह्यातील दिमानी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर हेही मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीच्या दिवसांत ते फ्रंटफूटवर फलंदाजी करत होते. निवडणुकीची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्यांच्या मुलाच्या कथित व्यवहाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ते शांत झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.