Bhopal : राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळण्यासाठी अनेक आमदार जीवापाड प्रयत्न करतात. पण कॅबिनेट मंत्रिपद मिळूनही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यास... आतापर्यंत असे उदाहरण ऐकिवात नव्हते. पण मध्य प्रदेशात सोमवारी असा प्रकार घडला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रामनिवास रावत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांना एकदा नव्हे तर दोन शपथ घ्यावी लागली.
रावत हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार होते. पण पहिल्यांदा शपथ घेताना त्यांनी चुकून राज्यमंत्री असा उल्लेख केला. ही चूक लक्षात आल्यानंतर राज्यपालांनी त्यांना दुसऱ्यांदा शपथ दिली. यावेळी राज्याचे मंत्री असे म्हणायला सांगून त्यांना शपथ देण्यात आली.
रावत यांनी काही मिनिटांच्या अंतरावर राज्यमंत्री आणि मंत्री अशा दोन्ही पदांची शपथ घेतल्याने हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायला गेले अन् आधी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने ही घटना सोशल मीडियातही व्हायरल होत आहे.
रामनिवास रावत यांनी लोकसभा निवडणुकीआधी 30 एप्रिलला काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर मतदारसंघातून ते सहाव्यांचा आमदार म्हणून निवडून आले होते. ते काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षही होते. गोपनीयतेची शपथ घेण्यापुर्वी त्यांनी विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला.
रावत यांच्यामुळे ग्वाल्हेर आणि चंबर भागात भाजपची ताकद वाढली आहे. कमलेश शाह आणि निर्मला सप्रे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा होती. पण त्यांना यावेळी संधी मिळाली नाही. मंत्रिमंडळात अजून तीन मंत्र्यांना संधी मिळू शकते. सध्या राज्यात 31 मंत्री आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.