Jharkhand bjp News : झारखंडमध्ये नुकतीच हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांना आता फ्लोअर टेस्टला सामोरं जायचं आहे. दरम्यान या ठिकाणी वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. भाजप नेते आणि माजी प्रवक्ते कुणाल षडंगी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील समस्यांबाबत ते सातत्याने आवाज उठवत आले आहेत, मात्र पक्ष नेतृत्व यासंबंधी उदासीन आहे. त्यांनी अंतर्गत शिस्तीबरोबरच तरुणांच्या मुद्य्यांवरही पक्षाची मौन भूमिका राजीनाम्याचे कारण सांगितले आहे. पत्रात कुणाल षडंगी यांनी लिहिले आहे की, मागील दिवसांत पक्षाचं प्रदेश प्रवक्ते पद त्यांनी सोडलं होतं. यानंतरही पक्षाने त्यांनी उपस्थित केलेल्या मुदय्यांकडे लक्ष दिले नाही.
आता त्यांना वाटतं की भाजप(BJP)मध्ये राहून पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील समस्या सोडवू शकत नाही. भाजपच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रदेशाध्यक्षांना आपला राजीनामा मंजूर करण्यास सांगितला. मागील महिन्यातच षडंगी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
कुणाल षडंगी जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या दावेदारांमध्ये होते आणि ते बहरागोडा येथून झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदारही होते. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या तिकीटावर बहरागोडा येथून पराभव झाला होता.
हेमंत सोरेन(Hemant Soren) तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. गुरुवारी त्यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. बुधवारी झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीनंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
हेमंत सोरेन यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली असून, 31 जानेवारी रोजी केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई सोरेन झारखंडच्या मुख्यमंत्री बनले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.