Shivraj Singh Chouhan sarkarnama
देश

Shivraj Singh Chouhan: 'दिल्लीत जाऊन काही मागण्यापेक्षा मी मरण पसंत करेन'...

Madhya Pradesh CM News : शिवराज सिंह चौहान पत्रकार परिषदेत झाले.भावूक

Anand Surwase

Madhya Pradesh :  मध्य प्रदेशमध्ये भाजपने आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. त्यानंतर आता भाजपने मोहन यादव यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजप पक्ष श्रेष्ठींच्या या निर्णयाने माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागला आहे. या दरम्यान चौहान यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन यादव यांना सहकार्य करणार असल्याचे मत व्यक्त केले. मात्र याचवेळी मी स्वत:साठी काही मागण्याऐवजी मरण पसंत करेन; पण दिल्लीला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मी दिल्लीला जाणार नाही

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेल्या दिवसापासून मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर शिवराजसिंह चौहान यांचीच वर्णी लागेल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात होता. मात्र भाजपने छत्तीसगड प्रमाणे या ठिकाणी देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलत ही जबाबदारी मोहन यादव यांच्याकडे सोपवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावर पत्रकारांनी शिवराजसिंह यांना मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला की राजस्थान, छत्तसीगडसह मध्य प्रदेशातील काही दिग्गज नेते वरिष्ठांच्या भेटीला गेले होते. त्याप्रमाणे तुम्ही ही दिल्लीत जाणार का?  त्यावर शिवराज सिंह म्हणाले की, मला यापूर्वी देखील पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, बाकीचे नेते दिल्लीत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही देखील दिल्लीत जाणार का? मात्र, मी नम्रपणे सांगू इच्छितो की "मी स्वत:साठी काही मागण्याऐवजी मरणं पसंत करेन,ते माझं काम नाही. त्यामुळे मी त्या दिवशी ही म्हणालो होतो मी दिल्लीला जाणार नाही" अशी प्रतिक्रिया देत चौहान यांनी मध्यप्रदेशातील राजकारणातच सक्रीय राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

तसेच शिवराजसिंह पुढे म्हणाले, 'की पक्षाने मला जवळपास 18 वर्ष मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री राहण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता यापुढे पक्षाकडे काही मागण्याची नाही तर पक्षाला आता काहीतरी देण्याची वेळ आली आहे. तसेच नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन यादव यांना मी पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचेही चौहान यांनी स्पष्ट केले. तसेच शिवराजसिंह यांनी मध्यप्रदेशात सुरू केलेल्या लाडली योजनेचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला. त्यावर चौहान म्हणाले की आम्ही आता राज्यात महिलांसाठी लखपती योजना राबवण्याची तयारी करत आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT