Winter Session 2023 : झिरवळांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवलं नाही; अजित पवार नाराज...

Sanjay Shirsat on Narhari Zirwal : नागपूर अधिवेशनात अजित पवार गटाच्या आमदारांना सपत्नीक वागणूक.... शिरसाटांचा अजब खुलासा
Sanjay Shirsat, Narhari Zirwal
Sanjay Shirsat, Narhari Zirwal sarkarnama

Nagpur News : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांना सापत्न वागणूक दिली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यातच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ सभागृहात उपस्थित असताना त्यांना अध्यक्षस्थानी बसू न देता तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार संजय शिरसाट त्याठिकाणी बसत असल्याने अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता याबाबत संजय शिरसाट यांनीच खुलासा केला आहे.

विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. मात्र त्याचबरोबर सत्ताधारी असलेल्या अजित पवार गट आणि शिंदे गटाचे आमदार देखील विविध मुद्यांवर समोरासमोर उभे ठाकत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Shirsat, Narhari Zirwal
Sanjay Raut : "नेहरू, गांधींवर टीका; मग मोदी त्यापेक्षा वेगळे आहेत का" ?...

अधिवेशनात महत्त्वाची विधायके आणि लक्षवेधी असताना झिरवळ यांना अध्यक्षस्थानी बसू दिले जात नाही याबाबत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराज व्यक्त केली आहे.त्यानंतर तालिका अध्यक्ष असलेल्या संजय शिरसाट यांना मुख्यमंत्र्यानी विनंती करत नरहरी झिरवळ यांना अध्यक्षस्थानी बसवले यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात अंतर्गत धुसफूस सुरु आहे का ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे. शिरसाट म्हणाले, झिरवाळ यांना खुर्चीवर बसण्यास त्रास होतो. त्यामुळे मी अध्यक्षस्थानी बसलो होतो. त्यांचा अनादर करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. झिरवळ आमचे मित्र आहेत. मात्र अजित पवारांना मी त्यांना बसू दिलं नाही, असं वाटलं पण तसं काही नाही असेही ते म्हणाले

Sanjay Shirsat, Narhari Zirwal
Kokan University of Fishery : मासे कोकणात, मत्स्य विद्यापीठ नागपुरात; डॉ. मुणगेकर समितीचा अहवाल कुणी दडपला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com