MP Election Result 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत, राजस्थानला सत्तेतून खाली खेचले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एकूण 199 जागांपैकी भाजप 117 जागांवर आघाडीवर आहेत, तर काँग्रेसला 67 जागांवरच आघाडी मिळाली आहे. या निवडणूक निकालावर विविध प्रतिक्रिया समोर येत असताना, भाजपचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना टोला लगावला आहे.
भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांचा प्रभाव असलेल्या चंबल-ग्वाल्हेर पट्ट्यातही मोठा विजय मिळवला आहे. या प्रसंगी प्रियंका गांधी यांचे ते विधान अनेकांना आठवत आहे. प्रियंका गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उंचीबाबत टिप्पणी केली होती. आता त्यांच्यावर ज्योतिरादित्य शिेंदेंनी नाव घेता पलटवार केला आहे. कोणतरी माझ्या उंचीबाबत टिप्पणी केली होती, ग्वाल्हेर-मालवाच्या लोकांनी दाखवून दिलं आहे की, त्यांची उंची काय आहे?
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मागील महिन्यात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी म्हटले होते की, ''भाजपचे सर्व नेते अजबच आहे. सर्वात अगोदर तर आमचे ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशात काम केलं होतं. त्यांचे उंची भलेही कमी असेल, परंतु अहंकार मोठा आहे. वा भाई वा...''
यावरूनच आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रियंका गांधींवर पलटवार केला, कुणीतरी माझ्या उंचाबाबत टिप्पणी केली होती. ग्वाल्हेर-चंबळ बेल्टमध्ये भाजपला मिळालेला मोठा विजय ज्योतिरादित्य शिंदेंचे वजन वाढवणारा आहे. विशेष म्हणजे दतियामधील सभेत बोलताना, प्रियंका गांधींनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती, त्यांना गद्दारही संबोंधलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.