Covid Vaccination Sarkarnama
देश

कोरोना लस न घेणं पडणार महागात; रेशन अन् दूधही होणार बंद!

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

भोपाळ : देशात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. परंतु, अनेक नागरिक कोरोना लस घेणे टाळत असल्याचे निदर्शनास आले आहेत. यासाठी सरकारने आता नवी शक्कल लढवली आहे. लस न घेतलेल्या नागरिकांचे रेशन आणि दूध बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश सरकारने हे पाऊल उचलले आहे. मागील काही दिवसांत कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे सरकारने नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर नागरिकांनी लस न घेतल्याचे त्यांचे सोईसुविधा कमी करण्याचेही ठरवले आहे. यानुसार लस न घेतलेल्या नागरिकांचे रेशन आणि दूध बंद होणार आहे.

रेशनिंग दुकानदार आता नागरिकांना रेशन देताना त्यांनी लस घेतल्याची विचारणा करीत आहेत. लस न घेतल्यास रेशन मिळणार नाही, याची पूर्वसूचनाही ते देत आहेत. काही ठिकाणी लस न घेतलेल्या नागरिकांनी हॉटेलमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी लस न घेतलेल्या नागरिकांचे दूध वितरण बंद करण्यात आले आहे. राज्यात 1.15 कोटी कुटुंबांतील 4.9 कोटी नागरिकांनी स्वस्त दरात रेशन मिळते. लसीकरण न झालेल्यांचे रेशन बंद करण्याचा आदेशही अन्न व पुरवठा विभागाने काढला आहे.

देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे. आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे.

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT