The Kashmir Files  Sarkarnama
देश

‘काश्मीर फाईल्स’वर बोलणं IAS अधिकाऱ्याला पडणार महागात; गृहमंत्र्यांनीच सांगितलं कारण...

द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच अनेक वाद निर्माण झाले आहे. भाजपकडून या चित्रपटाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच अनेक वाद निर्माण झाले आहे. भाजपकडून (BJP) या चित्रपटाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तर काश्मीरी पंडितांच्या (Kashmiri Pandit) नरसंहाराची सत्यता दाखवल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. या चित्रपटाबाबत अनेकांनी सोशल मीडियात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशी प्रतिक्रिया देणं एका आयएएस (IAS) अधिकाऱ्याला महागात पडणार आहे.

चित्रपटाने आतापर्यंत दोनशे कोटींची कमाई केली आहे. भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) अनेक भाजप नेत्यांनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही आपल्या भूमिका मांडल्या आहेत. पण मध्य प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव नियाज खान (Niyaz Khan) यांना सोशल मीडियात व्यक्त होणं महागात पडणार असल्याचे संकेत गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी दिले आहेत.

खान यांनी चित्रपटाविषयी ट्विट करताना म्हटलं आहे की, देशातील विविध राज्यांमध्ये मुल्सिमांचीही मोठ्या प्रमाणात हत्या होत आहे, त्यावरही चित्रपट बनवावा, अशी विनंती त्यांनी काश्मीर फाईल चित्रपटाच्या निर्मात्यांना केली आहे. या अल्पसंख्यांक समुदायातील सदस्यही माणसंच आहेत, कीटक नाहीत. यावर आता एक पुस्तक लिहिणार आहे. जेणेकरून काश्मीर फाईल्ससारखा चित्रपट बनवला जाईल, असं खान यांनी म्हटलं आहे.

या ट्विटवर बोलताना मिश्रा म्हणाले, मी खान यांची ट्विट पाहिली आहेत. हा खूप गंभीर मुद्दा आहे. सरकार अधिकाऱ्यांसाठी निश्चित केलेली लक्ष्मणरेषा पार करत आहेत, त्याचे उल्लंघन करत आहेत. राज्य सरकारकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल. त्यांचं याबाबत आपलं म्हणणं मांडावं लागेल, असं मिश्रा यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, खान यांनी चित्रपटाच्या कमाईतून काश्मीरी पंडितांच्या मुलासांठी शिक्षण त्यांना घर उभारणीसाठी खर्च करावा, असंही निर्मात्यांना सुचवलं आहे.

मेहबूबा मुफ्ती यांची टीका

पीडीपीच्या (PDP)अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी चित्रपटावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. ''द कश्मीर फाईल्स' चित्रपट मी पाहिलेला नाही, पण मी छत्तीसिंहपुरा हत्याकांड, नंदी मार्ग हत्याकांड मी पाहिले आहे. लष्करांच्या जवानांनी सात मुस्लिम युवकांची हत्या केली ते मी पाहिले आहे,'' असे सांगत मेहबूबा मुफ्ती (Mehbooba mufti)यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ''काश्मीरी पंडितांच्या हत्येबाबत भाजप अनभिज्ञ आहे. काश्मीरी पंडिताच्या दुःखाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. ते काश्मीर खोऱ्यात व्देष परविण्याचे काम करीत आहेत,'' असा आरोप त्यांनी केला. (Mehbooba mufti on The Kashmir files movie)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT