Cm Shivraj Singh Sarkarnama
देश

BJP Politics : भाजपला सत्ता मिळवून देणाऱ्या ‘लाडली बहना’लाच सासुरवास; धक्कादायक माहिती समोर...

Rajanand More

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या महत्वाकांक्षी ‘लाडली बहना’ योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. भाजपचा ऐतिहासिक विजय याच योजनेमुळे सुकर झाल्याची कबुली शिवराह सिंह यांनीही दिली होती. पण ते मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताच नवीन सरकार या योजनेवर रूसल्याचे दिसते. विरोधी पक्ष असल्याने काँग्रेसने भाजप गंभीर आरोप केले आहेत.

लाडली बहना (Ladli Behana) योजनेअंतर्गत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (Mohan Yadav) यांनी बुधवारी 1 कोटी 29 लाख महिलांच्या बँक खात्यात 1 हजार 576 कोटी रुपये टाकण्यात आले. यापूर्वी लाभार्थी महिलांची संख्या 1 कोटी 31 लाख एवढी होती. काही महिन्यांतच महिलांच्या संख्येत तब्बल दोन लाखांनी घट झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. यावर काँग्रेसचे (Congress) विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी भाजप सरकारला घेरले.

सिंगार यांनी सोशल मीडियात ट्विटद्वारे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नव्या सरकारने लाडक्या बहिणींची संख्या दोन लाखांनी कमी केल्याचा आरोप करत सिंघार यांनी म्हटले आहे की, खोट्या जाहिरातींची सत्यस्थिती. जाहिरातीमुळे बनलेल्या भाजप (BJP) सरकारला कर्जाचा बोजा सहन होत नाही. राज्यातील लाखो लाडक्या बहिणींशी खोटं बोलून मतं मिळवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सप्टेंबर 2023 मध्ये शिवराज (Shivraj Singh) मुख्यमंत्री असताना 1.31 कोटी महिला लाभार्थी होत्या. आता ही संख्या दोन लाखांनी घटली आहे. सरकारी जाहिरातीतूनच हे दिसते. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) ही संख्या आणखी किती कमी होणार, हे नवीन मुख्यमंत्रीच ठरवतील. शिवराज हेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ राहावेत, असे नव्या मुख्यमंत्र्यांना का आवडेल?, असा सवाल सिंघार यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री बदलताच योजनेवर टांगती तलवार लटकली आहे. लोकांची ही शंका चुकीची नाही. सरकार भाजपचे असले तरी मुख्यमंत्री नवीन आहेत. आता लाडक्या बहिणींनाही समजले आहे की, भाजपचा हा निवडणुकीसाठीचा जुमला होता, त्याचा रंग आता उतरू लागल्याची टीका सिंघार यांनी केली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा लाभ ठराविक वयोगटातील महिलांना दिला जातो. त्यातून दरवेळी काही महिला आपोआप बाहेर पडणार आहेत. तसेच काही लाभार्थी महिलांचा मृत्यू झाल्याने आकडा कमी दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT