New Delhi: उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक दिवसांपासून बुलडोझर कारवाईमुळे चर्चेत आहेत. दंग्यातील आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवण्यात आल्याचं उत्तर प्रदेशातून समोर आलं होतं.तोच कित्ता आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री गिरवत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तीन मोठे निर्णय घेतले. त्यांची अमलबजावणीही सुरु झाली आहे.
उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करताना तसेच अन्य गंभीर गुन्ह्यांमधील आरोंपीवर कारवाई करण्यासाठी बुलडझोरची मदत घेतली जाते. अशीच कारवाई आता मध्य प्रदेशात मुख्यमंत्री यादव यांनी सुरु केल्यानं ते योगी यांच्या वाटेवर आहेत का, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोहन यादव यांनी तीन मोठे निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावले आहे. अतिक्रमणांवर कारवाई, उघड्यावर मटन-मासे विक्रीस बंदी, धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकावर बंदी असे तीन निर्णय यादव सरकारने घेतले आहे. याबाबत त्यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यांचे पालन न केलेल्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मोहन यादव मुख्यमंत्री झाल्यानंतरची मध्य प्रदेशात ही पहिलीच बुलडोझर मोहीम राबविण्यात येत आहे. काल (गुरुवारी) भोपाळमध्येच कारवाई करण्यात आली. महापालिकेने बुलडोझरने एका गुन्हेगाराचे बेकायदा घर पाडले. अतिक्रमांवर बुलडोझरने कारवाई करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे समाज माध्यमांवर 'बुलडोझर बाबा'म्हणून ओळखले जातात. त्यांनी अशी कारवाई करून योगींनी उत्तरप्रदेशात गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे.
मध्य प्रदेशचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांनी शपथ घेतली अन् दुसऱ्याच दिवशी भोपाळमध्ये बुलडोझर फिरला. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अतिक्रमण करून घर बांधले होते. महापालिकेच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे त्यांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. उघड्यावर मटन-मासे विकण्यास बंदी, ध्वनीक्षेपकांच्या आवाज मर्यादेबाबत न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करा, असा आदेश मोहन यादव यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.