Sanjay Raut: अदानींच्या घशात मुंबई जाऊ देणार नाही; राऊतांनी दंड थोपटले!

Dharavi News: अदानींना मुंबई गिळायची आहे. धारावी वाचविण्यासाठी मोर्चा काढणारच
Dharavi News
Dharavi NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: धारावीतील झोपडपट्टी भागाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. झोपडपट्टीतील नागरिकांना बिल्डिंगमध्ये त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. धारावीच्या या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी अदानी उद्योग समूहास मिळाली आहे. त्याला ठाकरे गटाने विरोध केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धारावीच्या पुनर्विकासावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

"उद्योगपती गौतम अदानी हे भाजपचे 'जावई' आहेत. भाजपच्या जावयाच्या घशात मुंबई जाऊ देणार नाही, अदानींना मुंबई गिळायची आहे. धारावी वाचविण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत," असे राऊत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

Dharavi News
Parliament Security Breach: संसद घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा अटकेत; चौघांचे मोबाईल घेऊन पळून...

बुधवारी संसदेत झालेल्या घुसखोरीवरुन संजय राऊतांनी भाजपवर टिका केली. घुसखोरी करणाऱ्या तरुणांना पास देणारे भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांना अद्याप अटक का केली नाही, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. "सभागृहात प्रश्न विचारले म्हणून १३ खासदारांना निंलबित करण्यात आले आहे. मोदी सरकारची ही दडपशाही सुरु आहे," असे राऊत म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानी उद्योग समूहाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. ठाकरे गटाकडून या मोर्चासाठी तयारी देखील केली जाते आगे. धारावी वाचविण्यासाठी ठाकरे गटाकडून 16 डिसेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गतच्या कामकाजात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकल्पातून स्थानिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून धारावीत मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.

पुनर्विकासात धारावीच्या नागरिकांना केवळ 300 चौरस फूट देऊ, असं सांगितलं जात आहे. त्यांना 400 ते 500 चौरस फुटांची घरे मिळायला हवीत. योग्य पद्धतीने सर्वेक्षण करावं, धारावीकरांना धाक दाखवून, दडपशाही किंवा दमदाटीच्या जोरावर सर्वेक्षण केलं तर शिवसेना हा कट हाणून पाडेल”, अशा इशारा उद्धव ठाकरेंनी नुकताच दिला आहे.

Dharavi News
Manoj Jarange: 'अल्टीमेटम'च्या आदल्या दिवशी जरांगेंची तोफ बीडमध्ये धडाडणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com