DCM Ajit Pawar Sarkarnama
देश

Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीने आणखी एका राज्यात दाखवून दिली ताकद; ‘स्थानिक’च्या निवडणुकीत केली कमाल

Ajit Pawar NCP Arunachal Pradesh : ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने कमाल केली आहे. राष्ट्रवादीचे तब्बल ३९६ सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी १५९ सदस्य आधीच बिनविरोध जिंकले आहेत.

Rajanand More

Local Body Elections Result : महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे. पक्षफुटीनंतर ही स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाचा या निवडणुकीत चांगलाच कस लागला. त्यामध्ये ते यशस्वी ठरले असून ३७ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत.

महाराष्ट्रातील निवडणुकांसह अजित पवारांनी आणखी एका राज्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. रविवारीच अरूणाचल प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच अरूणाचलमध्येही सत्ताधारी भाजप धुरंधर ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.

इटानगर महापालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपने २० पैकी तब्बल १४ जागा जिंकत सत्ता काबीज केली आहे. याठिकाणी राष्ट्रवादी ३ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. एलजेपीला दोन जागा तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे. काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपे जिल्हा परिषदेच्या एकूण २४५ सदस्यांपैकी १७० जागा जिंकल्या आहेत. त्यातील ५९ जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीला १४ जागा जिंकण्यात यश आले आहे. दि पीपल्स पार्टी ऑफ अरूणाचल या पक्षाला २८ जागा मिळाल्या असून काँग्रेस केवळ सात जागांपर्यंतच मर्यादीत राहिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने कमाल केली आहे. राष्ट्रवादीचे तब्बल ३९६ सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी १५९ सदस्य आधीच बिनविरोध जिंकले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचा ग्रामपंचायत सदस्यांचा आडा केवळ २१६ पर्यंतच पोहचू शकला. भाजपने एकूण ८ हजार २०८ जागांपैकी तब्बल ६ हजार ८५ जागा जिंकत आपला दबदबा कायम राखला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT