Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीबाबत सरन्यायाधीशांचा सर्वात मोठा निकाल; राज्य सरकारला नोटीस...

Maharashtra Political Update : माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार होती.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Supreme Court news : शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकमधील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी स्थिती होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्याने अटक टळली होती. पण त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम होती.

मुंबई हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली नव्हती. त्यामुळे कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच कोकाटेंच्या याचिकेविरोधातही कोर्टात याचिका दाखल झाली होती. या याचिका आज सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर आल्या.

कोकाटे यांच्याबाजूने ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. त्यांनी शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली. सरन्यायाधीशांनी त्यावर राज्य सरकारला नोटीस बजावत शिक्षेला स्थगिती दिली. तसेच कोकाटेंच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत आमदार म्हणून ते अपात्र ठरणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. मात्र, कोर्टाने आमदार म्हणून त्यांना कोणत्याही अधिकारांचा वापर करता येणार नाही, असेही कोर्टाने सांगितले आहे.

Manikrao Kokate
Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट; वेळ, ठिकाण ठरले? राऊत म्हणाले, धुमधडाक्यात...

सुप्रीम कोर्टाने कोकाटे यांना तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यांना आता कोणतेही मंत्रिपद किंवा महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारता येणार नाही. आमदार म्हणून त्यांना कोणतेही शासकीय पद मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोकाटे यांनी शिक्षेविरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली होती. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली नाही. वैद्यकीय कारणास्तव केवळ जामीन दिला होता.

Manikrao Kokate
Baramati Election Result : बारामतीत लक्ष्मण हाकेंनी दिलेलं आव्हान, ‘ती’ लेक जिंकली; 21 वर्षांच्या संघमित्राकडून अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव

हायकोर्टाच्या निकालामुळे कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम होती. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता कोर्टाच्या निकालामुळे कोकाटे यांच्या शिक्षेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांना अटकही होणार नाही आणि आमदारकीही शाबूत राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com