Congress, Assembly Election Sarkarnama
देश

Assembly Election 2024 : मतदान सुरू असतानाच काँग्रेसचा मोठा निर्णय; निकालापर्यंत चिडीचुप? 

Congress Exit Poll Election Result : महाराष्ट्रासह झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे.

Rajanand More

New Delhi : महाराष्ट्रासह झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत महाराष्ट्रात 45.53 टक्के तर झारखंडमध्ये 61.47 टक्के मतदान झाले आहे. मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या व संस्थांचे एक्झिट पोल येतील. कोणत्या राज्यात कुणाची सत्ता येणार, याचा अंदाज यातून समोर येईल.

मतदान प्रक्रिया सुरू असतानाच काँग्रेसने एक्झिट पोलबाबत मोठा निर्णय घेतल्याचे समजते. एक्झिट पोलच्या चर्चेत वृत्तवाहिन्यांमध्ये सहभागी न होण्याचे आदेश पक्षाने प्रवक्त्यांना दिल्याची चर्चा आहे. याबाबत ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस पक्ष एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार नाही, या ‘एएनआय’ने म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसने हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच त्यावेळीही एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. पण, नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. त्यामुळे आता या निवडणुकीबाबत काँग्रेस यु-टर्न घेणार की निर्णयावर कायम राहणार, याबाबत उत्सुकता आहे.

एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडीची सत्ता येणार, याबाबतचे कल समोर येतील. मात्र, लोकसभा निवडणुकीसह हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीबाबतचे बहुतेक एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. त्यामुळे महाराष्ट्राबाबत काय एक्झिट पोल येणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा थेट सामना आहे. तर झारखंडमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांत पडलेली फूट, 2019 च्या निवडणुकीनंतर झालेले सत्तानाट्य यापार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT