Rahul Gandhi on Vinod Tawade Case: विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटलमध्ये विनोद तावडेंच्या उपस्थितीत भाजप उमेदवार राजन नाईक आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांममध्ये मोठा वाद झाला. विशेष म्हणजे मतदानाला अवघे काही तासच शिल्लक असताना बविआकडून विनोद तावडे हे या ठिकाणी पाच कोटी रुपये वाटपासाठी आल्याचा आरोप केला गेला, शिवाय काही नोटांची बंडलं दाखवली गेली ज्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला.
ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली. तर महाविकास आघाडीने भाजप (BJP) विरोधात आक्रमक भूमिका घेत, तावडेंना अटक करण्याची मागणी केली आहे. तर यावरूनच राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे भाजपने बविआचा हा आरोप फेटाळून लावला आहे. आता याप्रकरणात सोशल मीडियावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'मोदीजी हे पाच कोटी कुणाच्या SAFE मधून निघाले आहेत?, जनतेचे पैसे लुटून तुम्हाला कोणी टेम्पो पाठवला?' असा केलेला आहे. तर विनोद तावडेंना अटक करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथल्ला यांनी केली आहे.
याशिवाय, 'भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले आहेत. विनोद तावडे बॅगेत भरून पैसे घेवून गेले होते आणि तिथे लोकांना बोलावून पैसे वाटत होते. ही बाब जेव्हा जनतेला समजील तेव्हा तिथे मोठा हंगामा झाला. पैशांसोबतच विनोद तावडेंचा व्हिडिओ देखील समोर येत आहे.
तसेच, महाराष्ट्रात मतदान होत आहे, त्याच्या ठीक आधी भाजपचे नेते पैशाच्या बळावर निवडणुकीवर परिणाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांपासून मोठ-मोठे नेते सहभागी आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणी माहिती घ्यायला हवी आणि कडक कारवाई करायला हवी.' असं काँग्रेसने म्हटलेलं आहे.
तर राहुल गांधीच्या ट्वीटला विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'राहुलजी तुम्ही स्वत: नालासोपाऱ्यात या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज चेक करा. माहिती न घेता बोलणं हे पोरकटपणाचं लक्षण आहे.' असं त्यांनी म्हटलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.