Yogi Adityanath Sarkarnama
देश

Yogi Adityanath : अजितदादा, मुंडे यांचा विरोध सोडा, खुद्द योगींच्याच मंत्र्यांची ‘बटेंगे तो कटेंगे’वर फुली

Yogi ministers oppose 'Batenge to Katenge' slogan: केशव प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असून योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ नाऱ्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Rajanand More

Uttar Pardesh News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या नाऱ्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले होते. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना भाजपसह महायुतीतील नेत्यांकडूनही या नाऱ्याला विरोध केला जात आहे. एवढेच नाही आता योगींच्या या नाऱ्यावर उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनीच फुली मारली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगेचे समर्थन केले आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा उत्तर प्रदेश नसल्याचे सांगत विरोध केला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांचा विरोधही समोर आला आहे.

महाराष्ट्रातील दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये परस्पर विरोधी सुर उमटत असतानाच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही हा नारा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी ‘एक है तो सेफ है’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाऱ्याला आपले समर्थन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाऱ्यावर थेट प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला आहे.

केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी हे कशाच्या संदर्भाने म्हटले ते माहिती नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही. पण पंतप्रधानांनी जो नारा दिला आहे, ‘सबका साथ सबका विकास’ आणि ‘एक है तो सेफ है’ हाच आमचा नारा आहे. मुख्यमंत्र्यांनी काही विचार करून हे म्हटले असावे, असे म्हणत मौर्य या वादापासून चार हात लांब राहिले आहेत.  

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्याकडून महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्ये बचेंगे तो कटेंगे नारा दिला जात आहे. त्याला महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्याचप्रमाणे अजित पवारांनीही प्रचारसभेत जाहीरपणे त्याचा विरोध केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन उपमुख्यमंत्री यावरून एकमेकांविरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT