Election Commission : टपाली मतदानाचा फोटो पोलिसाकडूनच व्हायरल; निवडणूक आयोगाकडून दणका

Postal voting photo leaked by police EC strict action: निवडणूक प्रक्रियेचे काम असलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभा निवडणुकीसाठी सध्या टपाली तसेच ज्येष्ठांसाठी घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. यादरम्यान एका पोलिस शिपाईने टपाली मतदान केल्यानंतर मतपत्रिकेचा फोटो काढून तो सोशल मीडियात व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गणेश अशोक शिंदे असे या पोलिस शिपायाचे नाव आहे. त्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी टपाली मतपत्रिकेव्दारे मत नोंदविल्यानंतर मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी ही माहिती दिली आहे.

Maharashtra Assembly Election
Rahul Gandhi : नरेंद्र मोदींचा मेमरी लॉस! राहुल गांधींची टोलेबाजी, थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं उदाहरण दिलं...

मुंबईत मलबार हिल मतदारसंघात विल्सन महाविद्यालय येथे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी सुविधा केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रातील मतदान केंद्र क्रमांक 3 वर शिंदे यांनी मतदाना हक्क बजावला होता. मतदान केंद्रावर मोबाईलला बंदी असताना त्यांनी त्याचा वापर केला.

मतदारांनी त्यांचे मतदान करीत असताना पुर्णतः गोपनियता बाळगून, मतदान करावे व मतदान पुर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व 13ए फॉर्म हा त्यासोबत असलेल्या लिफाफ्यात भरुन तो लिफाफा केवळ मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकणे अपेक्षित असेत. पण शिंदे यांनी मतदानाच्या गोपनियतेचा भंग केला.

Maharashtra Assembly Election
Chhagan Bhujbal Politics: महायुतीच्या `या` दिग्गज नेत्यावर आज जरांगे पाटील घालणार शेवटचा घाव!

गणेश शिंदे यांच्यावर मतदानाच्या गोपनीयता भंग केल्याप्रकरणी मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मतदान केंद्रात ईव्हीएम मशिनवर मतदान करतानाचे फोटो मतदारांकडून काढण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. पण पोलिस शिपायाकडूनच असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com