Congess Meeting Sarkarnama
देश

Congess Meeting News : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट; काँग्रेस अॅक्टिव्ह : लोकसभेच्या 20 जागांचे टार्गेट

Congress News : ज्येष्ट नेत्यावर ठराविक लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो

Congress Leader Meeting In Delhi : राज्यातल्या नेत्यांनी आपापसातले मतभेद विसरुन कामाला लागावे, येत्या लोकसभेसाठी राज्यातून किमान 20 जागा जिंकण्याचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीनंतर काँग्रेसला मोठी संधी असल्याचे पक्षाला वाटत आहे. राज्यातील काँग्रेसच्या (Congress) नेत्यांची आज (ता. 11 जुलै) नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये येत्या सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात यात्रा काढावी आणि नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात बस यात्रा सुरू करावी, असाही ठराव करण्यात आला आहे. काँग्रेसचे आतापासूनच लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यातील अनपेक्षितपणे घडणाऱ्या राजकीय घडामोडी, शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीची काँग्रेसची (NCP) भूमिका आणि काँग्रेसची सध्याची स्थिती यावर या बैठकीत दिर्घ चर्चा करण्यात आली.

नेत्यांनी आपापसातले वाद मिटवून कामाला लागावे, असा सल्ला काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिला. शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या घडामोडींचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नका, असाही सल्ला या बैठकीत नेत्यांना देण्यात आला आहे. लोकसभेसाठी किमान 20 जागांचे टार्गेट काँग्रेसकडून महाराष्ट्र प्रदेश समितीला दिले आहे.

प्रत्येकाने गट तट विसरून काँग्रेसला मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे. 'भारत जोडो' यात्रेचा अनुभव देशात सर्वात चांगला महाराष्ट्रामध्ये आल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी म्हटल्याचेही सांगितेल जात आहे. सर्व ज्येष्ठ नेत्यांना ठराविक लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी वाटून दिली जाणार असल्याची माहिती आहे.

या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी (Rahul Gandhi), के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, सतेज पाटील, अशोक चव्हाण, वर्षा गायकडवाड, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, मिलिंद देवरा, भाई जगताप, प्रणिती शिंदे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT