Mamata Banerjee News : पश्चिम बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. मतमोजणीसाठी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सुमारे 74 हजार जागांवर झालेल्या तीन स्तरीय पंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये ग्रामपंचायतीच्या 63 हजार 229 जागांसाठी निवडणुका आहेत. पंचायत समितीच्या 9 हजार 730 आणि जिल्हा परिषदेच्या 928 जागांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये 8 हजार 232 जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर 2 हजार 232 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपाने (BJP) 1 हजार 14 ठिकाणी विजय मिळवला आहे. तर 734 जागांवर आघाडी आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) 599 जागांवर विजय मिळवला आहे. तर 531 जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसने (Congress) 362 जागांवर विजय मिळवला आहे. 215 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. इतर जागांचे निकाल अजून यायचे आहेत.
9 हजार 730 पंचायत समितीच्या जागा आहेत. यामध्ये आतापर्यंत 261 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये 261 जागांवरही तृणमूलचे उमेदवार आघाडीवर आहेत. 928 जिल्हा परिषदेच्या जागांवरही निवडणुका आहेत. मात्र, त्यातील 10 जागांचीच माहिती हाती आली आहे. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसची आघाडी आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या निकालामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.