Maharashtra Sarkarnama
देश

Maharashtra election voting date : महाराष्ट्रात पाच टप्प्यांत लोकसभेसाठी होणार मतदान, 'या' आहेत तारखा...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Lok Sabha Election Voting Date 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. देशभर सात टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान होणार आहेत. यातील पाच टप्प्यांत महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या दिवशी मतदान होणार आहे. तर 7 जून रोजी मतमोजणी होणार आहे. (Maharashtra election voting date)

राज्यात पाच टप्प्यांत होणाऱ्या मतदानाचा (Lok Sabha Election) पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. तर 20 मे रोजी पाचवा टप्प्यातील मतदान होणार आहे.

  • पहिल्या टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश असणार आहे.

  • दुसरा टप्पा - 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल.

  • तिसरा टप्पा - 7 मे - रायगड, बारामती (Baramati), उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले येथे मतदान होणार आहे.

  • चौथा टप्पा - 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघाचा समावेश आहे.

  • पाचवा टप्पा - 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी देशभर 16 मार्चपासून आचारांहिता सुरू झालेली आहे. मतमोजणी 4 जूनला होणार असून आचारसंहिता 6 जून रोजी सामाप्त होणार आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने देशभरातील सर्व बूथवर आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यंदाच्या निवडणुकीत तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांना दिलासा देण्यासाठी आयोगाने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT