New Delhi News : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, देशात सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला तारखेला आहे, तर केंद्रात कुणाचे सरकार येणार, याचा निकाल चार जूनला लागेल. आयोगाकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम (Election Dates) जाहीर केला. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे राजीव कुमार म्हणाले. 16 जून रोजी मोदी सरकारचा (Modi Government) कार्यकाळ संपत आहे. देशात जवळपास 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. त्यामध्ये 49.7 कोटी पुरुष मतदार आहेत. 10.5 लाख पोलिंग स्टेशन, 55 लाखांहून अधिक ईव्हीएमचा (EVM) वापर केला जाणार आहे.
आतापर्यंत लोकसभेच्या 17 निवडणुका आणि 400 हून अधिक विधानसभा निवडणुका (Assembly Election) आतापर्यंत आयोगाकडून घेण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांत आम्ही खूप मेहनत केली आहे. आता मदार तुमच्या हातात आहे. त्यामुळे मतदान करा, असे आवाहन राजीव कुमार यांनी केले.
असे होईल मतदान (कंसात मतदारसंघ) -
पहिला टप्पा – 19 एप्रिल (102)
दुसरा टप्पा - 29 एप्रिल (89)
तिसरा टप्पा – 07 मे (94)
चौथा टप्पा – 13 मे (96)
पाचवा टप्पा – 20 मे (49)
सहावा टप्पा – 25 मे (57)
सातवा टप्पा - 01 जून (57)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.