Zykov-D Vaccine
Zykov-D Vaccine sarkarnama
देश

एकही डोस न घेतलेल्यांना 'जायकोव्ह-डी लस' मिळणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ओमीक्रोन (Omicron) व्हेरिएंटने जगातील २९ देशांमध्ये शिरकाव केला आहे. ओमीक्रोनचं संकट लक्षात घेता मोदी (Narendra Modi) सरकारनं देशात लसीकरण मोहीमेला (Vaccine) गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह सात राज्यांना झायडस कॅडिलाची (Zydus Cadila) जायकोव्ह-डी लस (Zykov-D Vaccine) देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजूनपर्यंत लसीचा एकही डोस न घेतलेल्या प्रौढांना ही लस देण्यात येणार आहे.

ही लस प्रामुख्याने प्रैाढांना देण्यात येणार आहे. अशा व्यक्तींची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्याची यादी करण्याची सूचना केंद्र सरकारनं प्रशासनाला दिली आहे. कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असताना आता कोरोनाचा नवा ओमायक्रोन व्हेरिएंट नवीन संकट वाढवताना दिसून येत आहे. हा विषाणू अवघ्या आठ दिवसात दक्षिण आफ्रिकेतून तब्बल २९ देशांमध्ये पसरला आहे. ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार लसीकरणाला (Vaccine)गती देत आहे.

याआधी ही लस 12 वर्षांवरील मुलांना देण्यास देशाच्या औषध नियंत्रकांनी परवानगी दिली होती, मात्र देशाच्या लसीकरण कार्यक्रमात तरी ती सध्या फक्त प्रौढांनाच दिली जाणार आहे. झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह डी लशीचे (Zykov-D Vaccine)1 कोटी डोस खरेदीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ऑर्डर दिली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, पंजाब, तामीळनाडू या सात राज्यांना ही लस दिली जाणार आहे. जायकोव्ह-डी तीन डोसची लस असून ‘सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड पंट्रोल ऑर्गनायझेशन’ने अलीकडेच 12 वर्षे व त्यापुढील मुलांसाठी या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी दिली होती. मात्र या लसीचा सध्या प्राधान्याने सात राज्यांतील प्रौढ नागरिकांसाठी वापर केला जाणार आहे.

‘हर घर दस्तक’

केंद्र सरकारच्या ‘हर घर दस्तक’ या मोहिमेची सद्यस्थिती आणि प्रगती यांचा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव, तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशनचे (एनएचएम) संचालक यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये गुरुवारी आढावा घेतला. ज्या जिल्ह्य़ांतील लोक मोठय़ा संख्येत करोनाच्या पहिल्या मात्रेपासून वंचित राहिले आहेत, असे जिल्हे झायकोव्ह-डी लस देण्यासाठी निश्चित करावे, अशी सूचना भूषण यांनी केल्याचे आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT