Mahavikas Aghadi Sarkarnama
देश

Mahavikas Aghadi: हालचालींना वेग, 'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ? हायकमांडची तातडीची बैठक

Ganesh Thombare

Delhi News: आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. 'मविआ'त जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. ठाकरे गटाने 23 जागा लढवण्याचे संकेत दिले आहे. तर काँग्रेसचा मात्र यासाठी विरोध आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे.

महाविकास आघाडीतील पक्षामध्ये समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरावा, असं आघाडीतील काही नेत्यांचं म्हणणं आहे. या सर्व घडामोडी पाहता आता दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने दिल्लीत 9 जानेवारीला काँग्रेस नेत्यांसह अन्य नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात तीन पक्षांमध्ये चर्चा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबरोबरच महाविकास आघाडीचा जागावाटपासंदर्भातील प्रायमरी फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अंतिम शिक्कामोर्तब 9 जानेवारीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात देखील चर्चा यावेळी होणार आहे. याबरोबरच 'वंचित'ला 'मविआ'मध्ये किती जागा द्यायच्या यावरही चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची असणार आहे.

दरम्यान, याआधी देखील काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना बोलावत त्यांच्याकडून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत जागावाटपासंदर्भातील मत जाणून घेतलं होतं. तसेच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली होती.

प्रकाश आंबेडकर अद्याप वेटिंगवरच

'इंडिया' आघाडीचा लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला आहे. केवळ त्याच्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्याबाबत अद्याप कोणतीही ठोस पावले उचलले जात नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे आघाडीत जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला अजून किती वेळ लागणार हे पाहावं लागणार आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT