वंचित बहुजन आघाडी शिवसेनेत प्रवेश करणार : शिवसेना खासदाराचे मोठे विधान

खासदार विनायक राऊत हे आज शिंदे गटाचे झाडी, हॉटेल, डोंगर फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत.
Vinayak Raut
Vinayak Raut Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी नुकताच शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष (Vanchit Bahujan Aaghadi) शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, असं विधान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सोलापुरात (Solapur) केलं आहे. (Vanchit Bahujan Aghadi to join Shiv Sena : MP Vinayak Raut)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहे, त्यानिमित्ताने खासदार राऊत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समर्थन दर्शवलं आहे.

Vinayak Raut
प्रवेशासाठी शिंदे गटाकडून मला फूस लावली होती; दोन दिवसांत सेनेत परतलेल्या तालुका उपप्रमुखांची कबुली

खासदार विनायक राऊत हे आज शिंदे गटाचे झाडी, हॉटेल, डोंगर फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे विनायक राऊत हे आमदार शहाजीबापू पाटलांवर काय तोफ डागतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकीकडे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे या चाळीस आमदारांचा उल्लेख गद्दार असा करून त्यांचा समाचार घेत आहेत, त्यामुळे राऊत हे शहाजी पाटलांवर कोणत्या शब्दांत निशाणा साधतात, याची उत्सुकता आहे.

Vinayak Raut
आता उद्धव ठाकरेंचे फडणविसांना थेट उत्तर : मोदी पर्व संपलय, हे लक्षात ठेवा!

दरम्यान, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीलच आहे. त्यामुळे एकत्र यायचं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलावं. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी कायमच उघडे आहेत, असेही विनायक राऊत यांनी या वेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com