Eknath Shinde .jpg Sarkarnama
देश

Eknath Shinde: दिल्लीत शाहांसोबत महायुतीची महाबैठक सकारात्मक; पण फोटोतली शिंदेंची 'बॉडी लँग्वेज' वेगळंच सांगतेय?

Delhi Mahayuti Meeting: राज्यात महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतरही सहा दिवस उलटूनही अद्याप सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहराही निश्चित करण्यात आलेला नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.

Deepak Kulkarni

New Delhi News : महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलेली महायुती सरकार कधी स्थापन करणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण आता दुसरीकडे महायुतीत खातेवाटप आणि मंत्रि‍पदांच्या संख्येवरुन निर्माण झालेला पेच सुटण्याची शक्यता होती.

त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दिल्लीत गुरुवारी (ता.28) महायुतीच्या नेत्यांची महाबैठक पार पडली.या बैठकीतले काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) बॉडी लँग्वेज महाराष्ट्रात काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील महायुती (Mahayuti) सरकार स्थापनेसाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर,दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अतिशय महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीकडे महायुतीसह महाराष्ट्राची पुढील राजकीय दिशा ठरवणारी म्हणून पाहिले गेले.

महायुतीच्या बैठकीआधी दिल्लीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. त्यातउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आधीच दिल्लीत पोहचले होते. फडणवीसांनी तिथे पोहचल्यानंतर महायुतीच्या बैठकीआधी खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी अजित पवारांसह, प्रफुल पटेल,तटकरे यांच्यासह चर्चा केली. ही बैठक जवळपास दीड ते दोन तास चालली.या बैठकीनंतर अजित पवार आणि फडणवीस हे अमित शाहांच्या निवासस्थानी बैठकीसाठी दाखल झाले.

Mahayuti Meeting

मात्र, त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या घरी एकीकडे फडणवीस-अजितदादा यांच्यात बैठक सुरू असतानाच दुसरीकडे शाहांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा,व गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शिंदेंची बैठक पार पडली.या बैठकीत शिंदेंची पुढील वाटचाल आणि सरकारमधील शिवसेनेची मंत्रीपदं यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीतील भाजप नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे,यांच्यासह सर्वच नेत्यांच्या चेहर्‍यावर हास्य दिसून आलं. पण नेहमीचा एकनाथ शिंदेंचा हसरा चेहरा या बैठकीत गंभीर होता.त्यांच्या चेहर्‍यावर हास्याची एक लकेरही या फोटोमध्ये पाहायला मिळताना दिसत नाही.त्यावरुन भाजपकडून त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळणार नसल्याचा निरोप देण्यात आल्याचा अंदाज बांधला जात आहे.

राज्यात महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतरही सहा दिवस उलटूनही अद्याप सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहराही निश्चित करण्यात आलेला नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. त्याचमुळे ही महायुतीच्या प्रमुख नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत गुरुवारी रात्री उशिरा बैठक बोलावण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT