Milind Narvekar Video : उद्धव ठाकरेंची भाजपशी जवळीक? विश्वासू नेत्याकडून काँग्रेसचा विरोध असणाऱ्या रश्मी शुक्लांचे अभिनंदन

Milind Narvekar Congratulations to DCP Rashmi Shukla : उद्धव ठाकरेंच्या पराभूत झालेले उमेदवारांकडून आपण स्वबळावर लढले पाहिजे. काँग्रेसपासून अंतर राखले पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Milind Narvekar News: विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली होती. शुक्लांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे काँग्रेसने तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले. मात्र, निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर शुक्ला यांची पुन्हा पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रश्मी शुक्ला यांनी पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत शुक्ला यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये नार्वेकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदाची (DGP) जबाबदारी स्वीकारल्याबद्दल रश्मी शुक्ला जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Breaking: फडणवीसांची 'सीएम' पदासाठी फिल्डिंग? दिल्लीत दाखल होताच घेतली 'या' दोन बड्या नेत्यांची भेट

रश्मी शुक्ला या पदावर असल्याने निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार नाही, असा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला होता. शुक्ला या फडणवीसांच्या निकटवर्तीय आहेत म्हणून त्यांना मुदतवाढ देत त्यांनी पोलिस महासंचालक पद दिल्याचा आरोप देखील काँग्रेसकडून करण्यात आला होता.

ठाकरेंची भाजपशी जवळीक?

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या नवनिर्वाचित आमदार तसेच पराभूत झालेले उमेदवार यांच्याकडून आपण स्वबळावर लढले पाहिजे. काँग्रेसपासून अंतर राखले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे रश्मी शुक्ला यांचे अभिनंदन मिलिंद नार्वेकर यांनी करत भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होते आहे.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Mahayuti News : 'सीएम'पदानंतर आता फडणवीसांच्या गृह खात्याचीच डिमांड; शिंदे शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा खटके ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com