Defence Research & Development Organisation: DRDO अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेशी संबंधित एका व्यक्तीनं पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी Inter-Services Intelligence ला (ISI) लष्कराशी संबंधित अत्यंत संवेदनशील अशी गोपनिय माहिती पुरवल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राजस्थानच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटनं (CID) त्या व्यक्तीला अटक केली आहे. तसंच त्याच्याकडं सखोल चौकशी केली जात आहे.
महेंद्र प्रसाद असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती राजस्थानातील DRDOच्या गेस्ट हाऊसचा मॅनेजर आहे. चंदन फील्ड फायरिंगजवळ असलेल्या गेस्ट हाऊसची व्यवस्था तो पाहत होता. मंगळवारी सीआडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्याला रिमांडमध्ये घेऊन पुढील चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याची मागणी कोर्टाकडं करण्यात आली.
याप्रकरणी सीआयडीचे जनरल इन्स्पेक्टर विष्णुकांत यांनी सांगितलं की, "स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विदेशी एजंट्सकडून करण्यात येणाऱ्या भारतविरोधी कारवायांवर लक्ष ठेवलं जात असतानाच महेंद्र प्रसादबाबत महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली. सीआयडीच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली की, जैसलमेरच्या डीआरडीओच्या गेस्ट हाऊसच्या चंदन फील्ड फायरिंग रेंजमध्ये कान्ट्रॅक्टवर नेमणूक झालेला मॅनेजर महेंद्र प्रसाद हा ISIच्या संपर्कात आहे. पाकिस्तानच्या या गुप्तचर एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहत आहे. याद्वारे तो भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होता.
महेंद्र प्रसाद हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. त्यानं ISIला क्षेपणास्त्रांसंबंधी तसंच इतर शस्त्रांच्या परीक्षणासाठी फायरिंग रेंजमध्ये येणाऱ्या डीआरडीओच्या वैज्ञानिकांना तसंच भारतीय लष्कराच्या हालचालीची माहिती एकत्र करत होते. त्यानंतर ही माहिती ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ISI एजंटला पुरवत होता.
सीआयडीला गुप्त माहिती मिळाल्यानंतर महेंद्र प्रसाद याची भारताच्या विविध गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान जेव्हा त्याचा मोबाईल अधिकाऱ्यांनी तपासला तेव्हा अधिकाऱ्यांना धक्काच बसला. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून तो देशासंबंधीची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंट्ना पुरवत होता. त्यानंतर त्याला तातडीनं ताब्यात घेण्यात आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.