Shankar Mandekar Emotional : कला केंद्रात भाऊ गेला; चूक झाली म्हणत अजितदादांचा आमदार ढसाढसा रडला, पत्नीलाही अश्रू अनावर!

Shankar Mandekar Emotional Speech NCP Ajit Pawar : शंकर मांडेकर यांना भाषणात अश्रु आवरता आले नाही. भावाकडून झालेल्या चुकीबद्दल त्यांनी माफी मागितली.
Shankar Mandekar Emotional Speech
Shankar Mandekar Emotional Speechsarkarnama
Published on
Updated on

Pune News : काही दिवसांपूर्वी यवत येथील चौफुला येथे एका कला केंद्रावर गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमध्ये भोर-मुळशी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ कैलास मांडेकर यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं होतं.

भावाने केलेला कृत्याबाबत प्रतिक्रिया देताना शंकर मांडेकर यांनी आपण वारकरी संप्रदायाशी निगडित असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर आज वारकरी संप्रदायाच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये शंकर मांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान माझ्या भावाची चूक झाली म्हणत शंकर मांडेकर यांच्या डोळ्यात अश्रू आले. पतीला भावूक होताना भावून शंकर मांडेकर यांच्या पत्नीला देखील अश्रू अनावर झाले.

शंकर मांडेकर म्हणाले, 'मी नेहमी सांगतो मी माळकरी नाही पण वारकऱ्यांनी आणि माळकरांनी माझ्यावर एखाद्या साधुसंताप्रमाणे प्रेम केलं याची जाणीव मला आहे.माझ्या कुटुंबातील सगळे सदस्य इथे आहेत. मात्र कैलास मांडेकर यांचे नाव घ्यायला मी मुद्दाम मागे ठेवले. कारण काही काळापूर्वी एक चुकीची घटना घडली. त्यानंतर पत्रकारांनी मला घेरलं आणि विचारलं तुम्ही टोपी घालून समाजकारण आणि राजकारण करता तुम्ही स्वतःला वारकरी समजता मग हे कसं घडलं.'

'मी वारकरी नाही पण वारकऱ्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझी श्रद्धा वारकऱ्यांवर आहे. जे चुकीचं घडलंय त्याला काय शासन जायचं ते माझे वारकरी देतील. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस माझ्या सर्व वारकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं ज्याने चुकीचं काम केलं ते त्याचं बघतील तुम्ही तुमचं काम करा असा विश्वास वारकऱ्यांनी मला दिला.', असे देखील मांडेकर म्हणाले.

Shankar Mandekar Emotional Speech
Shirur Loksabha : 'शिवाजीदादा प्रेरणादायी व्यक्ती' : दिल्लीत अमोल कोल्हे-आढळराव पाटलांचं मनोमिलन; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराची यशस्वी मध्यस्थी

'मी संपूर्ण वारकऱ्यांची माफी मागतो. ज्यांनी चुकी केली त्याचा त्रास त्यांना होतोय आणि त्या चुकीची फळ त्यांना मिळत आहेत.माझे जे भावंड आहेत ते समाजामध्ये माझे प्रतिनिधी म्हणून काम करतात मला या गोष्टीचं वाईट वाटत आहे.' असं म्हणत शंकर मांडेकर यांना अश्रू आनावर झाले.

ही कीड नष्ट करण्याचा काम...

मांडेकर पुढे म्हणाले की, या समाजात मी कधीच कोणतच चुकीचं काम करणार नाही शरीर हे बळदंडच असलं पाहिजे मात्र जे चुकीचं काम करतात त्यांना मुळासकट उपटून टाकलं पाहिजे.कारण ही समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड नष्ट करण्याचं काम मी करत आहे. मी वारकरी संप्रदायाला जाहीर सांगतो वारकऱ्यांना कधी कमीपणा येईल असं मी वागणार नाही. माझ्या भावाची चूक झाली मात्र भविष्यात अशी चूक होणार नाही, याची मी काळजी घेईल असा विश्वास मी वारकऱ्यांना देतो.

'त्या' नेत्यांचे मानले आभार

'या कालावधीमध्ये वारकऱ्यांसोबत मला काही नेत्यांची साथ लाभली. विरोधकांनी टीका केली मात्र नेत्यांनी हे स्पष्ट सांगितलं की मांडेकरांची चुकी नसेल मी त्यांना दोषी धरणार नाही. या नेत्यांनी मला दिलेली ताकद आहे. याची जाण ठेवूनच आगामी काळात माझं काम सुरू राहील.' असं म्हणत शंकर मांडेकर यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांचे आभार मानले.

Shankar Mandekar Emotional Speech
Chicken-Mutton Ban : 15 ऑगस्टला चिकन-मटण विक्री बंदची निर्णय काँग्रेसचा; भाजपने 37 वर्षांपूर्वीचा 'तो' आदेशच दाखवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com