Mahua Moitra  Sarkarnama
देश

Mahua Moitra on PM Modi : 500 कोटींची ग्रँट, 1250 कोटी क्रेडिट दिले.... पण PM मोदींना मिळाला चुकीचा पुरस्कार? ममतादीदींच्या वाघिणीने ठेवलं चुकीवर बोट

Mahua Moitra latest statement on Modi government : टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या पुरस्कारावर प्रश्न उपस्थित केला आहे. 500 कोटींची ग्रँट आणि 1250 कोटींच्या क्रेडिटचा उल्लेख करत त्यांनी या पुरस्कारावर टीका केली.

Rashmi Mane

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्स सरकारकडून मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानाची देशभर चर्चा सुरू असतानाच या पुरस्कारावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पर्यावरण संरक्षण आणि लहान बेट राष्ट्रांच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत सेशेल्सने मोदी यांना ‘गार्जियन ऑफ द ब्लू होरायझन’ ही मानद उपाधी बहाल केली. मात्र या गौरवामागे आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी रविवारी हा सन्मान मोदी यांना प्रदान केला. परदेशी राष्ट्राकडून मिळालेला हा त्यांचा 34 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ठरला आहे. मात्र तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांनी या सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सोशल मीडियावरून सरकारवर टीका केली आहे.

महुआ मोइत्रा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, भारताने सेशेल्सला 500 कोटी रुपयांची अनुदान मदत आणि 1250 कोटी रुपयांचे क्रेडिट उपलब्ध करून दिले. त्यानंतर मिळालेल्या सन्मानपत्रावरच देशाचे नाव चुकीच्या स्पेलिंगमध्ये छापले गेले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी पुरस्काराच्या प्रमाणपत्रावरील शिक्क्याचा फोटोही शेअर केला. त्यामध्ये ‘Seychelles’ ऐवजी ‘Seycheeles’ असे चुकीचे स्पेलिंग असल्याचे दिसून येते.

या मुद्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली असून हा विषय सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. पश्चिम बंगालमधील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महुआ मोइत्रा यांचे हे वक्तव्य अधिक चर्चेत आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT