Education Policy : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता शालेय पुस्तकातून शिकता येणार वऱ्हाडी अन् मालवणी; 6 वीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल

Regional dialects in school textbooks : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता शालेय पुस्तकातून वऱ्हाडी आणि मालवणी बोलीभाषा शिकता येणार आहेत. 6 वीच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
Varhadi and Malvani language learning for students
Varhadi and Malvani language learning for studentsSarkarnama
Published on
Updated on

विद्यार्थ्यांसाठी यंदाचे शैक्षणिक वर्ष अनेक नव्या बदलांची भेट घेऊन आले आहे. आता केवळ पाठ्यपुस्तकातील धडेच नाही, तर महाराष्ट्राच्या समृद्ध बोलीभाषांचाही परिचय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातून होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने बालभारतीने अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करत सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वऱ्हाडी आणि मालवणी या बोलीभाषांचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना राज्यातील सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्य अधिक जवळून समजण्याची संधी मिळणार आहे.

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने यंदा इयत्ता 2 री, 3 री, 4 थी आणि 6 वीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. एकाच वेळी चार इयत्तांसाठी नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न मानला जात आहे. नव्या पुस्तकांमध्ये केवळ अभ्यासक्रमाचे अद्ययावतीकरण करण्यात आलेले नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमही समाविष्ट करण्यात आले आहेत.

Varhadi and Malvani language learning for students
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; 35 हून अधिक जणांचा मृत्यू, हल्ल्याचे भयानक PHOTOS आले समोर

महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच त्या भाषांमधील साहित्य आणि लेखकांविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने वऱ्हाडी आणि मालवणी भाषेचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक भाषिक परंपरेबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल.

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून पाठ्यपुस्तकांमध्ये सांकेतिक भाषा वापरण्याबाबत विशेष बोधचिन्ह देण्यात आले आहे. श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांना अध्यापन अधिक प्रभावीपणे समजावे यासाठी शिक्षकांना आवश्यक सूचना देखील पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Varhadi and Malvani language learning for students
Unmesh Patil News: शिवसेनेच्या माजी खासदारावर गुन्हा दाखल; PSI वरील आरोप भोवले, नेमकं प्रकरण काय?

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेलाही नव्या पुस्तकांमध्ये महत्त्व देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार चाइल्डलाइन, टेलिमानस आणि मनोदर्पण यांसारख्या हेल्पलाइनची माहिती पाठ्यपुस्तकांमध्ये देण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन सहज उपलब्ध व्हावे, हा त्यामागील उद्देश आहे.

याशिवाय पाठ्यपुस्तकांमध्ये QR Code, वॉटरमार्क, राज्यगीत, राज्यघटनेची उद्देशिका, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा आशय समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन पाठ्यपुस्तके ज्ञानासोबतच संस्कार आणि सामाजिक जाणीव वाढवणारी ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com