Maithili Thakur BJP Sarkarnama
देश

Maithili Thakur : बिहारमध्ये मैथिली ठाकूरचा बोलबाला; आमदारकीनंतर कमाई कुठून जास्त? गाणं की आमदारकी?

Maithili Thakur latest update bihar election : मैथिली ठाकूरची जास्त कमाई कुठून गाण्यांमधून की आमदारकीच्या राजकीय प्रवासातून? तिच्या उत्पन्नाच्या स्रोतांचा सविस्तर आढावा.

Rashmi Mane

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बंपर यश मिळाले आहे. एनडीएने 200 जागांचा आकडा पार केला असताना बहुचर्चित मैथली ठाकूरच्या जागेची चर्चा आहे. मैथलीने पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत वयाच्या 25 व्या वर्षी आपला पहिला विजय मिळवला आहे. त्यामुळेच गायनाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेल्या मैथली यांची आमदार झाल्यानंतर कमाई स्टेज शोपेक्षा जास्त असेल का, याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

बिहार स्टार उमेदवार मैथिली ठाकूर

अलीनगर सीटवर भाजपने या वेळेस मोठा जुगार खेळत मैथिली ठाकूर यांना तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात आरजेडीने(RJD) अनुभवी नेते बिनोद मिश्रा यांना रिंगणात उतरवले आहे. मतमोजणीत सहाव्या फेरी अखेर त्या आठ हजार मतांनी आघाडी घेत असल्याचे चित्र दिसत असले तरी. मैथिली ठाकूर अलीनगरमध्ये मैथिली ठाकूर आपली लोकप्रियता मतांमध्ये बदलू शकतील का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

गायकीतून मोठी कमाई

मैथिली ठाकूर यांचे देशभर मोठे फॅनबेस आहे. त्यांच्या लाईव्ह शोची मागणीही प्रचंड आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या महिन्याला 12 ते 15 शो करतात. एका शोची त्यांची फी 5 ते 7 लाख रुपये दरम्यान असते. म्हणजे महिन्याला त्या 60 ते 80 लाख रुपये कमावतात. वार्षिक कमाई सुमारे 7 ते 9 कोटी रुपये होते. त्यामुळे त्यांच्या गायकीमुळे त्यांना लोकप्रियतेबरोबरच मोठी आर्थिक स्थिरता मिळाली आहे.गायन क्षेत्राने त्यांना केवळ ओळखच नाही, तर एक भक्कम आर्थिक आधार दिला आहे, हे स्पष्ट आहे.

आमदारकीची कमाई आणि सुविधा

याउलट, आमदार म्हणून मिळणारे वेतन आणि अनेक भत्ते मिळतात. बिहारमध्ये एका MLA ची बेसिक सॅलरी 50,000 रुपये आहे. याशिवाय क्षेत्रीय, दैनंदिन बैठक, पर्सनल असिस्टंट, स्टेशनरी असे वेगवेगळे भत्ते मिळून मासिक कमाई अंदाजे 1.43 लाख रुपये होते. मात्र या पेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे MLA पदासोबत मिळणाऱ्या सुविधामध्ये सुरक्षा, सरकारी निवासस्थान, सवलतीच्या दरात वीज-पाणी-फोन बिल आणि सरकारी रुग्णालयात विशेष उपचार सुविधा मिळते.

दरम्यान, कमाईच्या हिशोबाने पाहिले तर मैथिली ठाकूर यांची गायकी ही आमदारकीपेक्षा कितीतरी पटीने फायदेशीर आहे. मात्र विधानसभा गाठल्यास केवळ पगार नव्हे तर सत्ता, प्रभाव आणि लोकसेवेची मोठी संधीचे दार त्यांच्या पुढे उघडते. त्यामुळे मैथिली ठाकूर यांची पुढील दिशा काय ठरेल, याकडे संपूर्ण बिहारचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT