Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये महागठबंधनची महाराष्ट्रासारखी स्थिती; विरोधी पक्षनेतेपदही मिळताना दमछाक होणार

Bihar 2025 results impact on Mahagathbandhan: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाराष्ट्रसारखं महागठबंधन आघाडीला विरोधी पक्षनेता बनवता येणार नसल्याची स्थिती आहे.
RJD Congress Mahagathbandhan
RJD Congress Mahagathbandhan Sarkarnama
Published on
Updated on

Opposition Leader in Bihar : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुपारी बारा वाजेच्या कलांनुसार महागठबंधन आघाडीचा पुरता धुव्वा उडल्याचं चित्र होतं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जी परिस्थिती झाली होती, तशीच परिस्थिती बिहारच्या मैदानात महागठबंधन आघाडीची झाली आहे.

विरोधी पक्षनेता बनवता येणार नाही, एवढं देखील संख्याबळ महागठबंधन आघाडीने कलानुसार नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसारखीच स्थिती, बिहारच्या निवडणुकीत विरोधकांची झाल्याची दिसते.

बिहार विधानसभा निवडणुकीतील (Bihar Politics) दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या कलानुसार महागठबंधन 47 जागांवर आघाडीवर होती. आरजेडी 34, काँग्रेस सहा, तर डावे सात, व्हिआयपी पक्ष एक जागावर आघाडी आहे. महागठबंधनच्या एकूण आघाडी बघितल्यास विरोधी पक्षनेते पद देखील मिळते की नाही, अशी स्थिती आहे.

आरजेडीला गेल्या विधानसभा निवडणुकीत 76 जागांवर विजय मिळवला होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीत निम्म्या जागांची घट होत आरजेडी 33 जागांवर निकालांचा कल येईपर्यंत होता. विशेष म्हणजे, लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव दोघेही पिछाडीवर आहेत. निकालाचे कल येत होते, त्यानुसार आरजेडीचे प्रदेश कार्यालय, कार्यकर्ते यांच्यात नाराजीचे वातावरण पसरले होते.

RJD Congress Mahagathbandhan
Mumbai Muslims Controversy : खान नव्‍हे, मराठीच महापौर! तरच ते मुस्लिम आमचे! अमित साटम यांचे ठाम मत

'एनडीए'ने बिहारमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. सुरवातीच्या काळात महागठबंधन आघाडीवर (MVA) होती. परंतु निकालाचं चित्र पुढं स्पष्ट होत असताना, एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप 84, जेडीयू 75, एलजेपी 22 अन् एचएएम चार जागांवर आघाडीवर होते. एकंदर एनडीए 185 जागांवर आघाडीवर आहे.

RJD Congress Mahagathbandhan
Dawood Ibrahim Mumbai property case : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरण; नवाब मलिकांना न्यायालयाचा दणका

महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभा निवडणूक झाली. यात भाजप महायुतीविरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडी, असा सामना झाला. यात महायुतीने महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडवला. महायुतीने तब्बल 233 जागांवर विजय मिळवला. विरोधी महाविकास आघडीला 50 जागांवर यश मानावं लागलं.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपद रिक्त

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला सर्वाधिक 20, काँग्रेस 16 अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा जिंकला. विरोधी पक्षनेता मिळवण्यासाठी देखील महाविकास आघाडीकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतील एकाही पक्षाचे 29 आमदार निवडून आलेले नाहीत. त्यामुळे अजूनही विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे.

भाजपचं महाराष्ट्रातील यश

1980 नंतर महाराष्ट्राने कधीही पाहिलेले नाही असे हे अभूतपूर्व निवडणूक यश आहे. भाजप स्वबळावर 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com