Malda violence accused detained : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना बुधवारी धक्कादायक घटना घडली होती. मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथील नागरिकांनी सात अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले होते. विशेष म्हणजे हे अधिकारी कोर्टाने नियुक्त केले होते. त्यामुळे या घटनेचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. थेट सरन्यायाधीशांना प्रकरणाची दखल घ्यावी लागली. ते स्वत: मध्यरात्री दोन वाजेपर्यंत लक्ष ठेऊन होते.
निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने भाजपनेही थेट तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. टीएमसीने हे षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच गुरूवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांतही बंगाल सरकारवर चांगलेच भडकले होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधून काढला आहे.
बंगाल पोलिसांनी याप्रकरणी एमआयएमचा नेता मोफक्करुल इस्लाम याला अटक केली होती. तो वकील असून राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याला बागडोगरा विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. इस्लामविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतरच त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विशेष पथक नेमले होते.
मोफक्करुल इस्लाम याने २०२१ मध्ये उत्तर दिनाजपूर जिल्हायातील इटाहार मतदारसंघातून एमआयएमच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढविली होती. मागील काही दिवसांपासून तो सुजापूर आणि कालियाचक परिसरातील आंदोलनकांचे नेतृत्व करत असल्याचे तपासात समोर आले आहे. बुधवारी घडलेल्या घटनेचा म्होरक्याही तोच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेमकं काय घडलं बुधवारी?
मालदामधील कालियाकच येथील गट विकास अधिकारी कार्यालयाबाहेर बुधवारी दुपारी मोठे आंदोलन सुरू झाले. एसआयआरमधून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आल्याने मतदारांकडून रोष व्यक्त केला जात होता. सुरूवातीला मतदारांसोबत न्यायालयीन अधिकाऱ्यांची बैठक झाली. पण त्यातून तोडगा न निघाल्याने आक्रमक आंदोलकांनी कार्यालयाला घेराव घालत अधिकाऱ्यांना कोंडले. यामध्ये तीन महिला अधिकारीही होत्या.
तब्बल नऊ तास आंदोलकांनी कार्यालयाला घेराव घातला होता. त्यानंतर मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांना घेऊन जात असलेल्या पोलिसांच्या वाहनांवरही आंदोलकांनी दगडफेक केली. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. हे प्रकरण सरन्यायाधीश तसेच बंगाल हायकोर्टाच्या मुख्य न्यायमुर्तींपर्यंत पोहोचले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.