Teachers Recruitment : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी आता नवा नियम; निवड प्रक्रिया झाली आणखी कडक...

Teachers Recruitment | Pavitra Portal | New Rules GR : शिक्षण अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२५ या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहणार आहे.
Teacher recruitment
Teacher recruitmentSarkarnama
Published on
Updated on

Pavitra portal new rules : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षक पदभरती टीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाते. पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन पर्यायांपैकी क पर्याय स्वीकारण्याची मुभा असते. मात्र, मुलाखतीसह या पर्याय निवडणाऱ्या संस्थांकडून योग्य मुल्यमापन न करताच उमेदवारांची निवड केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

शिक्षणसंस्थांकडून मुलाखतीसह पदभरती प्रक्रियेत होत असलेल्या अयोग्य मुल्यमापनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व उमेदवारांच्या संपादणुकीचे व पात्रेतेचे योग्य मुल्यमापन व्हावे, यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित मानक कार्यपध्दती लागू करण्यात आली आहे. यापुढील काळात त्यानुसारच पदभरती करण्याचे आदेश विभागाने काढले आहेत.

शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी नवी गुणांकन प्रक्रिया अवलंबावी, असे आदेश देण्यात आले आहेत. सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील.

Teacher recruitment
Teachers recruitment : राज्यात 2017 नंतर झालेल्या शिक्षक भरतीचे होणार ऑडिट; हायकोर्टाच्या आदेशानंतर शिक्षण विभागाने काढला जीआर

उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाल्यास ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे, अशा उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती द्यावी. उमेदवारांचे वय देखील सारख असल्यास इयत्ता बारावीचे गुण विचारात घेण्यात यावेत, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालकानी संबधित संस्थेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे योग्यप्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे, याची खातरजमा करूनच उमेदवाराच्या निवडीस व नियुक्तीस मान्यता देण्यात यावी, असेही विभागाने नमूद केले आहे.

Teacher recruitment
Supreme Court : खळबळजनक घटना, अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले! सरन्यायाधीश प्रचंड संतापले, स्वत: मध्यरात्री 2 वाजेपर्यंत होते लक्ष ठेऊन...

शिक्षण अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२५ या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहणार आहे. त्यामुळे यापुढे मुलाखतीसह पर्याय निवडणाऱ्या शिक्षणसंस्थांना अत्यंत काटेकोरपणे नवा नियमांचे पालन करावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com