Narendra Modi, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge : मोदी सरकार जाणार; INDIA आघाडीला बहुमत मिळणार; काँग्रेसच्या नेत्यानं आकडाच सांगितला...

Sunil Balasaheb Dhumal

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा शनिवारी पार पडताना इंडिया आघाडीने विजयाचा दावा केला आहे. देशातील 543 पैकी इंडिया आघाडी कमीत कमी 295 ठिकाणी विजयी होणार असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी केला. निकालापूर्वीच खर्गेंना केलेला हा दावा किती खरा ठरणार हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, भाजपकडून जे काही दावे केले जातात ते सर्व खोटे आहेत. भाजपने देशभर जी काही हवा तयार केली ती कशी फुसकी आहे, हेच आम्ही जनतेला सांगत आलो आहे. आता इंडिया आघाडी 295 जागा जिंकणार आहे. हा आकडा स्थानिक नेत्यांनी लोकांशी चर्चा करूनच सांगितलेला आहे. हा जनतेचा सर्व्हे आहे. त्यावरच इंडिया आघाडीला बहुमत मिळणार हे निश्चित झाल्याचे खर्गेंनी ठासून सांगितले.

देशात सरकारी सर्व्हे होतच राहतात. भाजपकडे आकड्यांचा खेळ करण्यासाठी मोठी यंत्रणा आहे. मीडियाच्या माध्यमातून खोटे पसरवले जात आहे. त्यामुळे जनतेचे नेमके काय मत आहे हेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच काम करत आहोत, असे म्हणत खर्गेंनी Mallikarjun Kharge भाजपवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी त्यांनी इडिया आघाडीच्या बैठकीत झालेल्या चर्चेबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, मतमोजणी दिवशी शेवटपर्यंत लक्ष देण्याचे आदेश पदाधिकऱ्यांना देण्यात आले आहेत. सी फॉर्म घेणे, तसेच सर्व प्रकिया पूर्ण होईपर्यंत कुणीही केंद्र सोडणार नाही. त्याला सर्वांनी मान्यता दिली आहे.

खर्गेंनी मतमोजणीत गडबड होण्याची शंकाही व्यक्त केली. ते म्हणाले, रविवारी निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. त्यांना सागणार की आधी बॅलेट पेपरवर मतदान होत होते त्यावेळीही मोजणीत गडबड होत होती. आताच्या यंत्रणेतही गडबड होण्याची शक्यता आहे. आमच्या शंकाबाबत त्यांना सांगणार आहोत. त्यावर समाधान घेऊन त्याबाबतचे पत्र देशातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याची आग्रह करणार असल्याचेही खर्गेंनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT