Mallikarjun Kharge on SEBI Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge on Hindenburg Report : मल्लिकार्जुन खर्गेंचा 'SEBI'वर हल्लाबोल ; संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीचीही मागणी!

Mayur Ratnaparkhe

Hindenburg Report and Mallikarjun Kharge News : अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्गच्या रिसर्च रिपोर्टने पुन्हा एकदा भारतात खळबळ माजवली आहे. हा रिपोर्ट समोर आल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'SEBI'वर झालेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी केली आहे.

एवढच नाहीतर काँग्रेस अध्यक्ष खर्गे(Mallikarjun Kharge) म्हणाले आहेत की, अदाणी समूह आणि 'SEBI'यांच्या संगनमताने झालेल्या घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)कडून केली जावी. या प्रकरणाची जेपीसीकडून चौकशी होणं आवश्यक आहे. अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या घटनात्मक संस्थांशी तडजोड करून आपल्या मित्रांना वाचवत राहतील.

अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चने 'SEBI'च्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि पती धवल बुच यांची अदानी उद्योग समुहातील काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती, असा आरोप केला आहे.

यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, सरकारला अदाणी समूहाच्या घोटाळ्याची चौकशी करून 'SEBI'वरील आरोपांबाबतची स्थिती स्पष्ट करावी लागेल. याचबरोबर तत्काळ कारवाईही करावी लागेल. एक्सवरील पोस्टमध्ये खर्गेंनी म्हटले की, जानेवारी 2023मध्ये हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर 'SEBI'ने सर्वोच्च न्यायालयात अदाणी समूहावरी आरोप फेटाळले होते. आता 'SEBI'वरच प्रमुख आरोप झाले आहेत.

याशिवाय खर्गेंनी असंही म्हटलं की, मध्यमवर्गीतील गुंतवणूकदार आपल्या कष्टाची कमाई शेअर बाजारात गुंतवत असतात. अशाप्रकारचे घोटाळे आणि आरोपांनंतर गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यांना संरक्षणाची आवश्यकता आहे. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी जेपीसी मार्फत करणं आवश्यक आहे.

हिंडनबर्गचे आरोप 'SEBI'आणि अदाणींने फेटाळले -

हिंडनबर्गच्या आरोपांना 'SEBI' प्रमुख माधवी पुरी बुच आणि पती धवल बुच यांनी आधीच निराधार म्हणत फेटाळलं आहे. याशिवाय अदाणी समूहाचेही म्हणणे आहे की हिंडनबर्गद्वारे करण्यात आलेले आरोप हे दुर्भावनापूर्ण, खोडसाळ वृत्तीने आणि भडकवण्याच्या उद्देशाने करण्यात आलेले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT