Hindenburg Report : ‘हिंडनबर्ग’च्या बॉम्बनंतर अदानींनी ‘सेबी’ प्रमुखांशी कनेक्शनचा केला खुलासा...

Madhabi Puri Buch SEBI Gautam Adani : हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Madhabi Buch, Gautam Adani
Madhabi Buch, Gautam AdaniSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चने भारतात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि पती धवल बुच यांची अदानी उद्योग समुहातील काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती, असा आरोप हिंडनबर्गने केला आहे.

हिंडनबर्गच्या आरोपांनंतर भारतातील राजकारण पुन्हा एक तापू लागलं आहे. शनिवारी रात्री हिंडनबर्ग हा बॉम्ब टाकल्यानंतर दररोज उच्चांक गाठणाऱ्या शेअर बाजाराबाबतही आता साशंकता निर्माण झाली असून विरोधकांनी एनडीए सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे.

Madhabi Buch, Gautam Adani
Jagdeep Dhankhad : विरोधकांची थेट उपराष्ट्रपतींच्या विरोधातच मोट; एनडीए सरकारला पहिला धक्का बसणार?

अदानी उद्योगसमुहाचा खुलासा

हिंडनबर्गच्या रिपोर्टवर अदानी उद्योगसमुहाने खुलासा केला आहे. माधवी पुरी यांच्याशी कोणतेही व्यावसायिक कनेक्शन नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. विदेश कंपन्यांमधील गुंतवणूक पूर्णपणे पारदर्शक आहे. रिपोर्टमधील आरोप दुर्भाग्यपूर्ण आहेत. आपल्याला केवळ बदनाम करण्यासाठी हे होत आहे. याआधीच्या आरोपांची चौकशी झाली आहे. ते निराधार असल्याचे सिध्द झाले आहे. सुप्रीम कोर्टाने जानेवारी 2024 मध्ये फेटाळून लावले आहेत, असे अदानी समुहाने म्हटले आहे.

माधवी बुच यांनीही आरोप फेटाळले

माधवी बुच यांनी हिंडनबर्गचे आरोप फेटाळून लावले आहेत. आपले आर्थिक व्यवहार पारदर्शक आहेत. हिंडनबर्गवर याआधी सेबीने कारवाई केली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याला उत्तर देताना त्यांनी चारित्र्यहनन करण्याचा पर्याय निवडला आहे, बुच दाम्पत्याने म्हटले आहे.

Madhabi Buch, Gautam Adani
CM Pramod Sawant News : प्रमोद सावंतांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी गोव्याबाहेरून रचलं जातंय षडयंत्र?

हिंडनबर्गचा अदानींवर दुसरा बॉम्ब

हिंडनबर्गने दीड वर्षांपुर्वीही अदानी समुहावर गंभीर आरोप केले होते. अदानींच्या शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये हेरफेरीपासून ते कर्जाबाबत अनेक दावे करण्यात आले होते. हे आरोपही अदानींनी फेटाळून लावले होते. पण हा रिपोर्ट बाहेर येताच अदानी कंपन्यांना मोठा फटका बसला होता. बहुतेक सर्वच कंपन्यांचे शेअर तब्बल 85 टक्क्यांनी खाली आल्याने अदानींच्या संपत्तीत 60 अब्ज ड़ॉलरची घट झाली होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com