Pawan Khera Sarkarnama
देश

Pawan Khera : 'ईद'चा अर्थ गुगलवर शोधा! खरगेंच्या बचावासाठी पवन खेडा मैदानात; भाजपला डिवचले

Pawan Khera defends Mallikarjun Kharge 'Happy Eid' remark during Diwali greetings, hits back BJP over its criticism and challenges leaders debate Rahul Gandhi : दिवाळीच्या शुभेच्छांमध्ये मल्लिकार्जुन खरगेंनी 'आनंदाची ईद'चा उल्लेख केल्याने भाजपचा संताप; पवन खेडांनी 'ईद'चा अर्थ सण असल्याचे सांगत भाजपला सुनावले, राहुल गांधींसोबत चर्चेचेही दिले आव्हान

Pradeep Pendhare

Mallikarjun Kharge Diwali speech : दिवाळीच्या शुभेच्छा देताना, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, 'आनंदाची ईद', असे केलेल्या विधानावरून भाजपमध्ये संतापाची लाट उसळली असून, देशभरातली भाजप मल्लिकार्जुन खरगेंवर तुटून पडली आहे.

याचवेळी काँग्रेस खासदार पवन खेडा यांनी, मल्लिकार्जुन खरगे यांची बाजू घेत, भाजपच्या बौद्धिक दिवाळखोरीवर हल्ला चढवून डिवचले आहे.

काँग्रेसचे खासदार पवन खेडा यांनी, भाजपमधील (BJP) कोणाकडे घरी शब्दकोश आहे का? असा प्रश्न करत, मला खात्री आहे की त्यांच्याकडे तो नसेल. मात्र, त्यांच्याकडे मोबाईल नक्कीच आहे. ते गुगलवर जाऊन 'ईद' या शब्दाचा अर्थ काय होतो, हे शोधू शकतात का? ईद म्हणजे 'सण'! दिवाळीचा सण, होळीचा सण, असाच त्याचा अर्थ आहे. खरगे यांना नेमके हेच सांगायचे होते. मात्र, सरकारमध्ये बसलेल्या या निरक्षर आणि अज्ञानी लोकांना त्याचा अर्थ कधीच समजणार नाही, असा टोला लगावला.

मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या भाषणावर आणि काँग्रेसच्या वक्तव्यांवर वेळ वाया घालवण्याऐवजी त्यांनी त्यातील अर्धा वेळ मोदीजींना शिकवण्यासाठी आणि राहुल गांधींसोबत होणाऱ्या आगामी चर्चेसाठी त्यांची तयारी करून घेण्यासाठी खर्च करावा. कारण ही चर्चा खरोखरच पाहण्यासारखी असेल, असा टोला पवन खेडा यांनी लगावला.

भाजपमध्ये राहुल गांधींसोबत चर्चा करण्याची एवढी भीती आहे का? जर त्यांच्यात चर्चा करण्याचे धाडस नसेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगावे की, आम्ही घाबरलो आहोत आणि राहुल गांधींसोबत चर्चा करू शकत नाही, असाही चिमटा पवन खेडा यांनी काढला.

दिवाळी सणाच्या शुभेच्छा देताना, मल्लिकार्जुन खरगे यांनी, भारताचा एक मोठा आणि अनेक दिवस चालणारा सण आहे, जो लोकांना एकत्र आणतो. आनंद देतो आणि कुटुंबातील प्रियजनांना भेटायला जोडतो. "आनंदाची ईद" असे म्हणत, देशवासियांना शांतता राखण्याचे, गैरसमज दूर करण्याचे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करण्याचे आवाहन केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT