

Mallikarjun Kharge Diwali statement : दीपावलीच्या शुभेच्छा देताना, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, केलेल्या विधानावरून भाजपने संताप सुरू आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी, दीपावलीला, 'आनंदाची ईद', असे म्हटल्याने भाजपने त्यांच्या या विधानावर टीकेची झोड उडवली आहे.
दिवाळीसारख्या पवित्र सणाच्या दिवशीही सनातन परंपरा आणि हिंदू समाजाच्या सन्मानापेक्षा 'व्होट बँकेचे राजकारण' महत्त्वाचे मानतात. काँग्रेस पक्षाने लाज वाटून घेतली पाहिजे, असेही घणाघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी केला.
दीपावली सणाच्या शुभेच्छा देताना, मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी, हा भारताचा एक मोठा आणि अनेक दिवस चालणारा सण आहे, जो लोकांना एकत्र आणतो. आनंद वाटण्याची संधी देतो आणि कुटुंबातील प्रियजनांना भेटायला जोडतो, असे म्हणताच "आनंदाची ईद" असे दीपावलीला म्हटले. देशवासियांना शांतता राखण्याचे, गैरसमज दूर करण्याचे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करण्याचे आवाहनही मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.
दीपावलीला आनंदाची ईद म्हटल्यावरून, भाजप (BJP) थेट काँग्रेसविरोधात आक्रमक झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी, "दीपावलीसारख्या पवित्र सणाच्या दिवशीही सनातन परंपरा आणि हिंदू समाजाच्या सन्मानापेक्षा 'व्होट बँकेचे राजकारण' महत्त्वाचे वाटके का? असा प्रश्न करताना काँग्रेस पक्षाने लाज वाटून घेतली पाहिजे."
मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्याकडे केवळ स्वतंत्र घटना म्हणून पाहता येणार नाही. सोनिया गांधी यांनी एकदा बाबरी वास्तू पाहून आपल्याला वेदना झाल्या आणि अश्रू अनावर झाले, असे म्हटले होते. याच सोनिया गांधी यांनी बटला हाऊस चकमकीतील दहशतवाद्यांसाठीही अश्रू ढाळले होते, असा घणाघात प्रदीप भंडारी यांनी केला.
आता मल्लिकार्जुन खरगे यांनी दीपावलीचा उल्लेख 'आनंदाची ईद' असा केला आहे. मात्र, अन्य कोणत्याही सणासाठी ते अशी उपमा देण्याचे धाडस करणार नाहीत. सनातन परंपरेची तुलना डेंगी, मलेरिया आणि एड्सशी करण्यात आली, तेव्हाही काँग्रेस पक्षाने पूर्णपणे मौन बाळगले होते. यावरून राहुल गांधी आणि गांधी-वाड्रा कुटुंबाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि धोरणे ही सनातनविरोधी आणि हिंदूविरोधी असल्याचे स्पष्ट होते. हा केवळ सनातन किंवा हिंदूविरोधी दृष्टिकोन नाही, तर त्यामागे जातीयवादी मानसिकता आहे. अशी मानसिकता देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी धोकादायक आहे, असेही भंडारी यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे दाखवून दिले आहे की, तुष्टीकरणाचे राजकारण आणि हिंदूंबद्दलचा द्वेष हीच पक्षाची सामान्य कार्यपद्धती बनली आहे. पक्षात टिकून राहायचे असेल, तर प्रत्येकाला हिंदूंच्या विरोधात बोलणे भाग पडते. याच कारणामुळे अयोध्येत भगवान श्रीरामांचे भव्य मंदिर उभारून अनेक वर्षे उलटली, तरी राहुल गांधी यांनी अद्याप मंदिराला भेट दिलेली नाही, असेही प्रदीप भंडारी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.