Mallikarjun Kharge, Narendra Modi News Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge News ''जब वोट लगे घटने, तो चुनावी तोहफ़े लगे बटने'' : खर्गेंनी ठेवले भाजपच्या वर्मावर बोट

LPG Cylinder Price News : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सरकारनामा ब्यूरो

Congress News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता. 29 ऑगस्ट) एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'जब वोट लगे घटने, तो चुनावी तोहफ़े लगे बटने !' अशा शब्दांत खर्गे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

खर्गे म्हणाले, निवडणुकीत मत कमी व्हायची भीती निर्माण झाली की भेटवस्तू वाटायला सुरूवात झाली आहे. जनतेच्या कष्टाचे पैसे लुटणारे निर्दयी मोदी सरकार आता माता-भगिनींबद्दल सद्भावना दाखवत आहे. साडेनऊ वर्षे 400 रुपयाचे एलपीजी सिलेंडर 1100 रुपयांना विकून सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत राहिले. तेव्हा एकही 'आपुलकीची भेट' मनात आली नाही का ? असा थेट सवाल खर्गे यांनी केला आहे.

देशातील 140 कोटी लोकांवर साडेनऊ वर्षे अत्याचार करून 'निवडणुकीसाठी लॉलीपॉप' देऊन चालणार नाही. हे भाजप सरकारला कळू द्या. तुमची दशकभरातील पापे धुतली जाणार नाहीत. भाजपने (BJP) लागू केलेल्या महागाईला तोंड देण्यासाठी, काँग्रेस (Congress) पक्ष प्रथमच अनेक राज्यांमध्ये गरिबांना फक्त ५०० चे सिलिंडर वितरित करत आहे. राजस्थानसारख्या अनेक राज्यांनी याची अंमलबजावणी केली आहे.

मोदी सरकारने हे जाणून घेतले पाहिजे की 2024 मध्ये 200 रुपयांच्या अनुदानाने देशातील त्रस्त जनतेचा राग कमी करता येणार नाही. 'इंडिया'ची भीती चांगली आहे, मोदीजी ! जनतेने आपला निर्णय घेतला आहे. महागाईवर मात करण्यासाठी भाजपला बाहेरचा रस्ता दाखवणे हाच पर्याय आहे, असे खर्गे म्हणाले.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "गेल्या दोन महिन्यांत 'इंडिया' आघाडीच्या फक्त दोनच बैठका झाल्या आणि आज आपण पाहतोय की एलपीजी गॅसची किंमत 200 रुपयाने कमी झाली आहे. ही आहे इंडियाची ताकद !''

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT