Kharge On Seat Allocation :  Sarkarnama
देश

Kharge On Seat Allocation : डॅमेज कंट्रोलमध्ये काँग्रेस; 'इंडिया' आघाडीचे जागावाटप कधी होणार? खर्गे म्हणाले...

Chetan Zadpe

Mallikarjun Kharge On India Alliance Seat Allocation : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकतेच मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीमधून सहकार्य केल्याने काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला होता. यावर कमलनाथ यांच्यासह यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनीही प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर इंडिया आघाडीतील जागावाटपाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस पक्ष सध्या डॅमेज कंट्रोल करण्यात योजना आखत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे की, 'आधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ द्या, त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चा होईल." यामुळे या पाच राज्यांच्या निवडणुकांनी इंडिया आघाडी एकजुटीने सामोरे जाईला का? भाजपला टक्कर देण्यासाठी एकदिलाने लढेल का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

कर्नाटकमध्ये एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "आमचे लोक सर्वत्र काम करत आहेत, आम्हाला आशा आहे की, आम्ही पाच राज्यांमध्ये नक्कीच जिंकू. आता भाजपविरोधी लाटही आली आहे, लोक भाजपला कंटाळले आहेत, बेरोजगारी आणि महागाईने लोक त्रस्त झाले आहेत. भाजपने निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे आम्हाला यश मिळणार हे निश्चित आहे."

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT