NCP Dhule News : महाराष्ट्रात राष्ट्रवादी फिजिकली अन् डिजिटलीही सक्षम होतेय

Sharad Pawar`s NCP is the only Spirit of Maharashtra-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा धुळ्यात महाराष्ट्राभिमान दौरा
Sharad Pawar & Mehboob Shaikh
Sharad Pawar & Mehboob ShaikhSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : भाजपने सत्तेचा उपयोग राजकीय कारस्थाने आणि तपास यंत्रणांचा दुरुपयोग करण्यासाठी केला. त्यांनी राज्याची प्रतिष्ठा व राजकीय प्रतिमा मलीन केली आहे. त्यांना फिजिकली अन् डिजिटली मजबूत होऊन उत्तर देण्यास राज्यात शरद पवार गट सक्षमपणे उभा आहे. (Sharad Pawar Group of NCP strongly starts to build party organisation)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी धुळे (Dhule) येथे संघटनात्मक बैठक घेतली. या वेळी त्यांनी आगामी काळात संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar & Mehboob Shaikh
Eknath Shinde Group : दसरा मेळाव्याला जाणाऱ्या शिंदे गटाच्या बसला अपघात

बूथ पातळीवर अधिक लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस जनतेचा आणि सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे काम करणाऱ्यांना संधी मिळते. विकासाचा विचार पुढे न्या. युवक हे राष्ट्रवादीचे प्रमुख बलस्थान आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे फिजिकल व डिजिटल संघटन मजबूत करावे, नवे कार्यकर्ते जोडावेत. आगामी निवडणुकीत आपण सर्व जण मिळून पक्षाची ताकद दाखवून द्या, असे आवाहन शेख यांनी या दौऱ्यात केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पक्षाच्या विस्तारासाठी महाराष्ट्रभिमान दौरा सुरू करण्यात आला आहे. या दौऱ्यात विविध आढावा बैठका पार पडल्या. जिल्ह्यातील आगामी निवडणुका लढविताना त्यात युवकांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यादृष्टीने सर्वांनी तयारीला लागावे. एक बूथ २० यूथ संकल्पना राबवून अधिकाधिक कार्यकर्ते जोडावेत. बूथ पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाने नियोजन केले आहे. त्याची अंमलबजावणी जोमाने करण्यावर सध्या भर देण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाला प्रभावी करण्यासाठी युवक शाखा जोमाने कामाला लागल्याची चिन्हे आहेत.

या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, निरीक्षक राहुल शेलार, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारुडे, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, ज्येष्ठ नेते एन. सी. पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जोसेफ मलबारी, छाया सोमवंशी, उषा पाटील, वाल्मीक मराठे आदी उपस्थित होते.

Sharad Pawar & Mehboob Shaikh
Shivsena Nashik News : ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून मोठी रसद!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com