Congress President Mallikarjun Kharge delivers a stern warning to non-performing leaders during the party’s national convention, urging retirement for those unwilling to work.  Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge : काम करायचे नसेल तर निवृत्त व्हा! कामचुकार नेत्यांना इशारा देताना खर्गेंनी केली मोठी घोषणा

Mallikarjun Kharge’s Bold Message to Congress Leaders : गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोनदिवसीय अधिवेशनाला सुरूवात झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी यावेळी काम न करणाऱ्या नेत्यांना इशारा दिला आहे.

Rajanand More

Congress Politics : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात काम न करणाऱ्या नेत्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. पक्षाचे संघटन मजबूत करण्याबाबत बोलत असताना त्यांनी विविध निवडणुकांमध्ये उमेदवार निवडीबाबतही मोठी घोषणा करत यापुढे जिल्हाध्यक्षांना महत्व प्राप्त होणार असल्याचे संकेत दिले.

खर्गे यांच्यासह पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी नुकतीच देशभरातील जिल्हाध्यक्षांच्या बैठका घेतल्या. याबाबत माहिती देताना खर्गे यांनी अधिवेशनाच्या व्यासपीठावरूनच काम न करणाऱ्या नेत्यांना घरी बसण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या विधानानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून स्वागतही केले.

खर्गे म्हणाले, जिल्हाध्यक्षांची नुकतीच बैठक घेतली. त्यांच्यासाठी एक गाईडलाईन तयार करण्यात आली आहे. त्यांनी नियुक्तीनंतर एक वर्षाच्या आत चांगल्या कार्यकर्त्यांना घेऊन बुथ कमिटी बनविणे, मंडल कमिटी, ब्लॉक कमिटी बनविणे, जिल्हा कमिटी बनवायची आहे. यामध्ये कोणताही पक्षपातीपणा व्हायला नको.

काँग्रेस संघटनेच्या मजबुतीत जिल्हाध्यक्षांची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती एआयसीसीच्या गाईडलाईनुसार निष्पक्षपातीपणे होणार आहे. देशभरातील जिल्हाध्यक्षांच्या तीन बैठका घेतल्या आहेत. पुढील कार्यवाही त्यानुसार होईल, असे खर्गे यांनी स्पष्टपणे सांगितले.

पक्षाच्या कामात जे लोक सहभागी होत नाहीत, त्यांना आराम करण्याची आवश्यकता आहे. जबाबदाऱ्या पार पाडायच्या नसतील, तर निवृत्त व्हायला हवे, असे कामचुकार नेते आणि पदाधिकाऱ्यांबाबत खर्गे म्हणाले. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत जिल्हाध्यक्षांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे, अशी घोषणाही खर्गे यांनी यावेळी केली.

राहुल गांधी यांच्यामध्य गरीबांसाठी काम करण्याची खूप ऊर्जा आहे. पण आपण फक्त झिंदाबाद, झिंदाबाद करत फिरलो तर काही होणार नाही. आपण जेव्हा जिंकू, तेव्हा जयजयकार करा, असा सल्ला खर्गे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.

आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढत आहोत. या लढाईत शत्रू हा अन्याय, असमानता, भेदभाव, गरिबी आणि सांप्रदायिकता आहे. पूर्वी विदेशी शक्तींकडून याला ताकद दिली जात होती. आता आपलेच सरकार हे काम करत आहे. आपल्याला ही लढाईही जिंकायची आहे. त्यासाठी राहुल गांधी, आम्ही तयार आहोत. आम्ही कधीही घारबरणार नाही, पुढे जात राहू, असे म्हणत खर्गेंनी आपले भाषण संपविले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT