Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee News : महाराष्ट्र निवडणुकीतील ‘त्या’ कथित घोळाची कुणाकुणाला भीती? ममतादीदी झाल्या सावध...

Maharashtra assembly Election BJP Won West Begal Election : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूकही तृणमूलकडून कुणाशीही आघाडी न करता लढण्याची दाट शक्यता आहे.

Rajanand More

Politics in India : हरियाणापाठोपाठ महाराष्ट्र अन् आता दिल्लीत भाजपने दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली. निवडणूक निकालानंतर मात्र विरोधकांकडून भाजपच्या विजयाची विविध कारणे सांगितली जात आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यापार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या सुप्रिमो व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सावध झाल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूकही तृणमूलकडून कुणाशीही आघाडी न करता लढण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पक्षाकडून तयारीही सुरू करण्यात आली आहे. ममतादीदीही सक्रीय झाल्या असून गुरूवारी त्यांनी कोलकाता येथील नेताजी स्टेडियमवर सर्व खासदार, आमदारांसह इतर महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती.

बैठकीमध्ये ममतांनी महाराष्ट्र आणि दिल्लीतील भाजपच्या विजयाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आरोप केले. दिल्ली आणि महाराष्ट्रात भाजपने हरियाणा आणि गुजरातमधील लोकांना बनावट मतदार बनवून निवडणूक जिंकली होती, असा आरोप ममतांनी केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्याचेही जाहीर केले.

ममता म्हणाल्या, ‘गरज भासल्यास मतदारयादीतून बोगस मतदारांची नावे वगळण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू.’ मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरूनही ममतांनी भाजपवर आरोप केले. भाजप निवडणूक आयोगाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे. आयोग निष्पक्ष होईपर्यंत निवडणूकही निष्पक्ष होणार नाही, असे त्या म्हणाल्या.

भाच्यासोबत मतभेद?

ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. त्याबाबत बोलताना अभिषेक यांनी या बैठकीत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मी तृणमूलचा एक निष्ठावंत शिपाई आहे माझ्या नेत्या ममता बॅनर्जी आहेत. मी भाजपमध्ये जाणार असल्याच्य अफवा पसरवल्या जात आहेत. पक्षातील गद्दारांना उघडे पाडत राहणार असल्याचा इशाराही अभिषेक यांनी दिला.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT