Mamata Banerjee Allegations on BSF and Modi government : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी दावा केला आहे की, ''बॉर्डर सिक्युरिटी फोर्स(BSF) बांगलादेशींना घुसरखोरीसाठी मदत करत आहे आणि यामुळेच पश्चिम बंगालमध्ये अशांतता निर्माण होत आहे. हा सगळा केंद्र सरकारचा अजेंडा आहे.'' ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. तर भाजपने यावरून ममता बॅनर्जींवर जोरदार टीका सुरू केली आहे.
ममता बॅनर्जींनी म्हटले आहे की, जर बीएसएफ(BSF) अशाप्रकारच्या कृत्यांना प्रोत्साहन देणे सुरूच ठेवणार असेल, तर तृणमूल काँग्रेस त्यांच्याविरोधात आंदोलन करेल. आम्ही अनेकदा याबाबत केंद्र सरकारला कळवले आहे. केंद्र जो काही निर्णय घेईल आम्ही तो मान्य करू. आम्ही केंद्राकडे एक विरोध पत्रही पाठवू.
याशिवाय, ममता बॅनर्जींनी म्हटले की, बीएसएफ बॉर्डरवर अवैध घुसखोरी रोखण्यासाठी तैनात आहे. परंतु ते इस्लामुपूर, सीताई आणि चोपडा बॉर्डरवरून बांगलादेशींना भारतात घुसण्याची परवानगी देत आहे. बीएसएफ महिलांवर देखील अत्याचार करत आहे. ते घुसखोरांना बंगालमध्ये घुसू देतील आणि तृणमूल काँग्रेसला(TMC) दोष देतील तर असं चालणार नाही.
ममता बॅनर्जींच्या(Mamta Banerjee) या आरोपानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटले की, खरंतर पश्चिम बंगाल सरकारने बांगलादेशींसाठी रेड कार्पेट टाकलं आहे. पश्चिम बंगाल हे घुसखोरांसाठी नर्सरी बनलं आहे. बंगाल सरकारने सुरुवातीस बांगलादेशींसाठी रेड कार्पेट आंथरलं आणि नंतर टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींनी बांगलादेशींच्या नावावर राजकारण केलं. हे हास्यास्पद आहे. खऱंतर या लोकांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.
दुसरीकडे भाजपच्या(BJP) आरोपावर तृणमूल काँग्रेसकडून खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे सर्वच नेते प्रत्येक प्रकरणात तृणमूल काँग्रेसला दोष देत असतात आणि आंदोलनाची भाषा करतात. परंतु बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्यांकावर सुरू असलेल्या अत्याचारावर मोदी सरकारकडे बोलण्यास काहीच नाही. जर पश्चिम बंगालमधील भाजप नेते बांगलादेशात अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराबाबत खरोखरच चिंतीत असतील, तर मग ते दिल्लीतील मोदी सरकारला याबाबत ठोस पावलं उचलण्यास का सांगत नाहीत?
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.