
US Nightclub Attack News : अमेरिकेत पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. न्यूयॉर्कमधील एका नाइट क्लबमध्ये अंदाधूंद गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. या भीषण हल्ल्यात 11 जण गोळीबारात जखमी झाले आहेत. ही घटना न्यूयॉर्कच्या क्वीन्स शहरातील अमाचूरी नाइट क्लबमध्ये झाली आहे.
न्यू ऑर्लिन्समध्ये भरधाव ट्रक जमावात घुसला आणि त्याने अनेकांना चिरडले होते. ज्यामध्ये 15 जण जखमी झाले होते. या घटनेच्या काही तासांनंतरच लास वेगासमध्ये ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बरोबर बाहेर टेस्लाच्या सायबर ट्रकचा मोठा स्फोट झाला होता.
याशिवाय जमैकामधील अमाजुरा इव्हेंट हॉलजवळ 1 जानेवारी रोजी रात्री 11.45 वाजता गोळीबाराची घटना घडली होती. ज्यामध्ये प्राप्त माहितीनुसार किमान तीनजण गंभीर जखमी झाले होते आणि यासर्व घटनानंतर 24 तासांच्या आतच ही चौथी घटना घडल्याने अमेरिका हादरली आहे.
या घटनेनंतर न्यूयॉर्क पोलीस(Police) विभागातील अनेक यूनिट्स घटनास्थळी पोहचले आणि तपास सुरू केला. सोशल मीडियावर व्हायरल या घटनेच्या व्हिडिओत मोठ्याप्रमाणात पोलीस आणि रुग्णवाहिका नाइट क्लबच्या बाहेर बघू शकतो. खरंतर आतापर्यंत न्यूयॉर्क पोलिस विभागाने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. हा नाइट क्लब शहरातील नावाजलेला स्पॉट मानला जातो.
न्यूयॉर्क सिटी फायर डिपार्टमेंट(FDNY) आणि अन्य स्थानिक यंत्रणांचे एक पथक घटनास्थळी पोहचून पीडितांची मदत करत आहे. याशिवाय पोलिस आसापासच्या घरांध्ये जावून तपसणी करत आहे आणि घटनेबाबत अधिक माहिती जोडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.