Mamata Banerjee Sarkarnama
देश

TMC News: माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठा धक्का, बंडखोर आमदारांच्या गटानं अध्यक्षपदावरून हटवलं; 'टीएमसी' पक्षाबाबत खळबळजनक दावा

West Bengal Politics: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसताना दिसून येत आहे. 15 वर्षांनंतर बंगालची सत्ता गमावण्याची वेळ टीएमसीवर आली. यानंतर 58 टीएमसी आमदारांनी केलेल्या बंडाचं निशाण फडकवलं होतं. यानंतर काहीच दिवसांत दुसरा धक्का ममता बॅनर्जी यांना लोकसभेतील 20 खासदारांनीही स्वतंत्र गट निर्माण करत दिला.

Deepak Kulkarni

West Bengal News: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसताना दिसून येत आहे. 15 वर्षांनंतर बंगालची सत्ता गमावण्याची वेळ टीएमसीवर आली. यानंतर 58 टीएमसी आमदारांनी केलेल्या बंडाचं निशाण फडकवलं होतं. यानंतर काहीच दिवसांत दुसरा धक्का ममता बॅनर्जी यांना लोकसभेतील 20 खासदारांनीही स्वतंत्र गट निर्माण करत दिला. यानंतर बॅनर्जी यांना आता पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना सोमवारी(ता.22) मोठा धक्का बसला आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या गटानं ममता बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरूनच हटवलं आहे. तर त्यांचे भाचे व खासदार अभिषेक बॅनर्जी यांना थेट पक्षातून निलंबित केलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या गटाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्व बंडखोर आमदारांच्या गटानं थेट तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून ममता बॅनर्जी यांना हटवलं आहे. तर अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित करण्याचा ठराव मंजूर केला आहे.

विशेष म्हणजे या सर्व बंडखोर आमदारांच्या गटानं आमचीच तृणमूल काँग्रेस खरी असल्याचा दावा केला आहे. हा दावा करतानाच या बंडखोर आमदारांच्या गटाकडून संघटनात्मक समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीनंतरच ममता बॅनर्जी यांच्यासह त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याबाबतचे निर्णय घेण्यात आले आहेत.

ममता बॅनर्जी यांनी तब्बल 28 वर्षांच्या संघर्षानंतर टीएमसी पक्ष इथपर्यंत आणला आहे. टीएमसीसमोर एक ना अनेक प्रकारची आव्हानं होती. यानंतर त्यांनी तीन टर्म अर्थात 15 वर्ष पश्चिम बंगालच्या सत्ता मिळवत तेथील स्थानिकच्या राजकारणात स्वत:चा दबदबाही निर्माण केला आहे. त्यांनी ज्या ज्यावेळी सत्ता मिळवली,ती एकहातीच होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT